Home » एकेकाळी गरिबीतील दिवस, आज आहे कोट्यावधींचा मालक, कपिल शर्माचे ग्लॅमरस आयुष्य बघून चकित व्हाल
Articles खास किस्से

एकेकाळी गरिबीतील दिवस, आज आहे कोट्यावधींचा मालक, कपिल शर्माचे ग्लॅमरस आयुष्य बघून चकित व्हाल

हसणे हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. आपण जाता येत उठता बसता खूप वेळा हसतो. हाच हसण्याचा आनंद देत आपण स्वतःचे करियर करू असा विचार आपण कधी केला आहे का? तसेच कपिल शर्मा हा भारतातला विनोदवीर ,भारतातला एक सर्वात मोठा कॉमेडीमन ठरला आहे. व याच हसवण्याच्या कलेने त्याने त्याचे आयुष्य जिंकले व आत्ता त्याच्या करिअरच्या कळसावरआहे.

अभिनय, निर्मिती, दिग्दर्शक, प्रेझेंटर व इतर अनेक ललित कला त्याला अवगत आहेत. कपिल शर्मा २००७ मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कॉमेडी शोमधून तो चर्चेत आला. तो या शोचा विजेता बनला आणि त्याने पुरस्कार म्हणून १० लाख रुपये जिंकले. हळू हळू २०१७ मध्ये तो खूपच लाइमलाईट मध्ये यायला लागलाहाच ठरला त्याच्या आयुष्याचा टर्निंग पोइंट. या शो मुळे त्याने कॉमेडी क्षेत्रातील अनेक लोकांना घटकेत मागे टाकले. या शो नंतर त्याने अनेक टीव्ही शोमध्ये कॉमेडी शो मध्ये आपली कला दाखवून दिली. आणि म्हणनच आता तो जगातील सर्वोत्तम कॉमेडीयन लोकांमधील एक म्हणून ओळखला जातो.

कपिल शर्मा आज करोडो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतो. त्याच्या या यशाचे व प्रसिद्धीचे सर्व क्रेडिट्स जाते ते त्याच्याच स्वतःच्या शोजला. कपिल ने जेव्हा स्वतःचा ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ सर्व लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला व आपोआपच त्याला प्रसिद्धी मिळाली. जरी आज कपिल शर्मा एवढा मोठा झाला असेल तरी त्याची पहिली पायरी हि त्याने त्याच्या स्वतःच्या छोट्या कुटुंबातूनच टाकले. कपिल शर्माचा जन्म अमृतसरच्या एका छोट्या घरात झाला. एका छोट्या कुटुंबात जन्म झाला असला तरी त्याने आज जे यश मिळवले आहे ते खूप वाखाणण्यासारखे आहे.

तसेच कपिल शर्मा आज खूप ग्लॅमरस जीवन जगत आहे. कॉमेडीचा किंग बनलेला कपिल शर्मा आज कोट्यवधींचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याचे घर देखील एक कोट्यावाधींची मालमत्ता आहे. या माणसाने सुरुवातीचे दिवस खूप गरिबीतील पहिले आहे, पण आता त्याने पूर्ण चित्रच बदलून टाकले आहे. कपिलला महागड्या गाड्या खरेदी करण्याची आवड आहे. आज कपिलकडे १.१९ कोटींची मर्सिडीज बेंज S क्लास, १.३ कोटींची वोल्वो XC 90, ५.५ कोटींची वैनिटी वैन, १५ कोटींचा DHL एनक्लेवमध्ये फ्लॅट, २५ कोटींचा पंजाबमध्ये बंगला आहे. या फक्त 5 गोष्टी आहेत ज्या त्याच्याकडे आहेत. पण याशिवाय कपिल कोट्यवधींचा मालक आहे. कपिल शर्मा गिन्नी चतरथ सोबत लग्न केले आहे व कपिलला मागच्या वर्षी १० डिसेंबरला एक गोड मुलगी झाली.