Home » ‘डबल मिनिंग’ कॉमेडी करून मराठी चित्रपटातील नाव अमर झालेला नट
Articles खास किस्से

‘डबल मिनिंग’ कॉमेडी करून मराठी चित्रपटातील नाव अमर झालेला नट

जसे अनेक नेते मंडळी मराठी माणसांसाठी लढत होते, त्याच कळात एक मराठी अभिनेता मराठी सिनेसृष्टीसाठी लढत होता.. डबल मिनिंग कॉमेडी करून प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याची कला त्याला एकदम सहज अवगत होती.. त्याने हा मार्गच काढला होतं जणू.. व या मार्गावर चाळूनच दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार बनले. 8 ऑगस्ट रोजी १९३२ दादा कोंडके यांचं जन्म झाला होता. त्यांना सामान्य माणसांचे प्रतिबिंब पडद्यावर दाखवणारा नायक म्हणून ओळखले जायचे. २५ आठवडे चित्रपट चित्रपटगृहात ज्याचे चालायचे असा हा नट होता. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही त्यांच्याबद्दल खास गोष्टी ऐका.


दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके होते. गरिबीत बालपण गेले व मित्रांसोबत गुंडगिरी करत ते मोठे झाले. दादा यांना राजकारनाचीही फार आवड होती. त्यामुळे यात देखील त्यांचा सहभाग होता.. शिवसेनेत त्यांने मराठ्यांसाठी हक्क मिळवण्यासाठी प्रवेश केला. दादांमुळे शिवसेनेच्या सभांना खूप प्रतिसाद मिळायचा. आपल्या विरोधकांवर भाषणातून हल्ला करण्याची एक त्यांची वेगळीच स्टाईल होती.

‘इच्छा माझी पुरी करा’ या नाटकातून दादा कोंडके प्रसिद्ध झाले

इंदिरा गांधी यांची या नाटकात खूप चेष्टा केली होती त्यामुळे हे नाटक कॉंग्रेस विरोधी मानले जाते. या नाटकाचे दादा कोंडकेंनी १०० हून अधिक प्रयोग केले होते. १९७५ ‘पांडू हवालदार’ हा सिनेमा ज्यात त्यांची मुख्य भूमिका होती, तो चित्रपट देखील त्यांचं खूप गाजला होता. तेव्हा पासून दादांना पांडू हवालदार म्हणूनच उद्गारले जाते. ‘सोंगाड्या‘ ‘आली अंगावर‘ हे त्यांचे गाजलेले सिनेमे. गायक महेंद्र कपूर यांच्यासोबतची दादांच्या जोडीने खूप मोठी कामगिरी केली. या विनोदवीर कलाकाराला डबल मीनिंग काढत विनोदी चित्रपट करणे म्हणून ओळखले जाते. म्हणूनच ते मराठी चित्रसृष्टीत या खासियातीसाठी लोकप्रिय आहेत. सेन्सॉर बोर्डासमोर दादांचे चित्रपट पास करणे म्हणजे मोठी जबाबदारी असायची कारण त्यांच्या चित्रपटाचे शीर्षक खूप वेळा अश्लील असायचे.


भारत माता थीएटरमध्ये त्यांच्या अंतःतिथी च्या निमित्ताने त्यांचेच चित्रपट दाखवण्याची परंपरा सुरु झाली. त्यांच्या 7 चित्रपटांनी सुवर्ण मोहत्सवीसोहळा गाठला होता. त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये देखील नोंदविले गेले होते. आली अंगावार, तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथे गुदगुल्या, तोच नवरा पाहिजे असे अनेक त्यांचे चित्रपट अजरामर झाले. अनेक हिंदी सिनेमात देखील कोंडकेंनी काम केले होते. तेरे मेरे बीच मी जो पहिल्यांदा मराठीत चित्रित झाला होता, हा त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता.