आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेत येणार होते तेव्हा त्यांनी एक घोषणा केली, आणि सर्वांना एकच धक्का बसला ही घोषणा फार मजेशीर होती. मोदी यांनी घोषणा केली की ते प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करतील. सामान्य नागरिकांना तर मोदीनी पंधरा लाख रुपये खरंच जमा करतील असे वाटले.
अनेकांना आस लागली पण असं काही झालं नाही. विरोधकांनी देखील या विषयांवरून मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी दुसऱ्यांदा निवडून आले तरी देखील पैसे काही जमा झाले नाहीत, पण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील शेतकऱ्याला मात्र एक दिवस एक सुखद धक्का बसला, त्यांच्या खात्यात अचानक पैसे जमा झाले. ज्ञानेश्वर औटे असे त्या शेतकऱ्यांचे नाव आहे. ते दावरवाडी येथील निवासी आहेत.
ते शेती करतात. त्यांच्या बँक ऑफ बडोदा या खात्यात पैसे जमा झाले. सर्वात आधी त्यांना वाटले चुकून कोणाचे तरी पैसे खात्यात जमा झाले असतील त्यामुळे त्यांनी काही दिवस ते पैसे काढले देखील नाहीत, नंतर काही दिवसानंतर मात्र त्यांच्या लक्षात आले की हे पैसे आपलेच असतील. त्यांनी त्या पैशांतून घर बांधायचे ठरविले.
त्यांनी घर बांधण्यासाठी 9 लाख रुपये वापरले. घर उत्तम बांधून झालं पण बँक आणि ग्रामपंचायत यांनी मात्र आता शेतकऱ्यांना पुन्हा पैसे मागत आहेत. बँकेचे असे म्हणणे होते की शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेले पैसे हे पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे आहेत, ते चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाले होते.
काही दिवसांनंतर ते ज्ञानेश्वर यांच्या लक्षात आले. जेव्हा कर्मचाऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्याने ते पैसे वळते करून घेतले. आता बँक ज्ञानेश्वर यांना उरलेले पैसे मागत आहे. ज्ञानेश्वर यांनी मोदी यांना म्हणजे पंतप्रधान कार्यालयाला धन्यवाद देणारा मेल देखील पाठविला आहे.