कर्नाटकातील पीईएस कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स येथे मंगळवारी हिजाब घातलेल्या एक विडियो खूप व्हायरलं झाला. सर्वात आधी आपण हा विडियो काय होता हे जाणून घेऊया. पीईएस कॉलेजमध्ये एका मुलीने तिची गाडी पार्क केली आणि ती वर्गाकडे जाऊ लागली.
ती मुस्लिम समुदयातील मुलगी होती, तिने हिजाब परिधान केला होता. तिला पाहताच कॉलेज कॅम्पस मधील काही युवकांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यांना वाटलं ती मुलगी घाबरेल पण ती मुलगी मात्र घाबरली नाही.
तिने त्या मुलांना प्रतिउत्तर दिलं , अल्ला हू अकबर मग मात्र ती मुलं चांगलीच चिडली, ती मुलं आणखी जोरात घोषणा देऊ लागले. त्यामुलीने हे देखील संगितले की ते मुलं असभ्य वर्तन करत होते.
हे सर्व सुरू असताना प्राचार्य महादेव जे आणि काही शिक्षक तेथे पोहचले आणि त्यांनी त्या मुलांना हुसकावून लावले.
ही घटना घडल्या नंतर त्या मुलीने एक विडियो बनविला आणि नेमकं काय घडलं हे सर्व सांगितलं. त्या मुलीने स्वताचे नाव मुस्कान असे संगितले तसेच ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकते हे देखील सांगितले. तिचं असं म्हणण आहे की हे तरुण कॉलेज मधील नव्हते ते बाहेरचे होते.
तरुणांच्या एका गटाने पोलिस आयुक्ताकडे बुरखा आणि हिजाब यांच्या बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली होती. मुस्लिम मुली हिजाब घालू शकतात तर मग आम्ही देखील हिरवी शाल पांघरू कारण आम्ही देखील शेतकरी आहोत.
या विडियोला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवएसी यांनी ही प्रतीक्रिया दिली आहे, त्यांनी या मुलीच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यांनी एक विडियो पोस्ट करत त्यांनी तरुणीला सलाम केला आहे.
ते म्हणतात तरुणीच्या आई- वडिलांना सलाम करतो. या मुलीने एक उत्तम उदाहरण समोर ठेवलं आहे, भीख मागून, आणि रडून काही मिळत नाही. या मुलीने जे काम केलं आहे त्याला धाडस लागतं.
या मुलीच्या धाडसाचे जमियत उलेमा- ए- हिंद यांचे अध्यक्ष यांनी देखील कौतुक केले आहे, त्यांनी या मुलीला पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.