Home » एका लग्नाची संवेदनशील गोष्ट, वाहिनीला आधार देत चिमूकलीचा काकाच बनला बाबा
Articles खास तुमच्यासाठी!

एका लग्नाची संवेदनशील गोष्ट, वाहिनीला आधार देत चिमूकलीचा काकाच बनला बाबा


एका लग्नाची दुसरी गोष्ट आपण अनेकदा वाचत असतो. पण सध्या अहमदनगर येथील अकोले तालुक्यात अशीच घटना घडली आहे. भावाच्या निधनानंतर वाहिनी आणि पुतणी यांची जबाबदारी लहान भावाने घेतली आहे. लहान भावाने आपल्या विधवा वाहिनी सोबत लग्न केले आहे. एका लग्नाची ही संवेदनशील गोष्ट प्रत्येकाने वाचायला हवी.

भावाने मोठेपणा, वहिनीचा सामंजस्यपणा आणि कुटुंबीयांनी दाखविलेला समजदारपणा यामुळे या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. अनेक दिवस दुखात असणाऱ्या कुटुंबामध्ये आता आनंदाची लहर आली आहे. हे शक्य झाले आहे घेतलेल्या योग्य निर्णयामुळे. नीलेश कारभारी शेटे वय 31 यांचे 14 ऑगस्ट 2021 रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन झाले. ते हिरापाडा येथील एका आश्रम शाळेत काम करत होते.

या आसश्रम शाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यांना कोरोनाची बाधा झाली. निलेश यांना देखील बाधा झाली. कोरोनातून ते सावरले पण त्यांच्या मेंदूमध्ये मात्र गाठ झाली, त्यामध्येच त्यांचे निधन झाले. नाशिक येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची 23 वर्षीय पत्नी आणि अवघ्या 19 महिन्यांची छोटी चिमुकली यांचे आता पुढे कसे होणार असा प्रश्न सर्वान समोर उभा राहिला. सर्व कुटुंबीय चिंतेत पडले.

कारभारी शेटे यांना त्यांच्या सुनेला पाहून तीची अधिकच चिंता वाटत असे. निलशे यांचा लहान भाऊ समाधान वय वर्ष 26 याने मनांची गाठ बांधली आणि चिमूकल्या पुतणीकडे पाहून तिचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. चुलते, वडील यांच्या विचाराने आणि वाहिनीच्या समंतीने वाहिणीशी लग्न गाठ बांधण्याचे ठरविले. म्हाळसादेवी मंदिरच्या आवारात हा लग्न सोहळा पार पडला.

समाधान शेटे यांचे चुलते, सीताराम शेटे, सामाजिक कार्यकर्ते माधव तिटमे, भाऊ मंगेश शेटे आणि पुनमच्या माहेरचे कुटुंबीय यासर्वांनी एका सकारात्मक मताने विचार केला. पुनमच्या मनाची मानसिकता तयार केली. आणि हा विवाह योग जुळून आला.