Home » स्टेशनवर 20 रुपयांत जेवणारा एक साधा मुलगा जेव्हा मराठी स्टार होतो. संतोष जुवेकर यांची संघर्षमय कहाणी.
Articles Food & Drinks झाल कि व्हायरल!

स्टेशनवर 20 रुपयांत जेवणारा एक साधा मुलगा जेव्हा मराठी स्टार होतो. संतोष जुवेकर यांची संघर्षमय कहाणी.


मराठी चित्रपट विश्वात म्हणजे छोट्या आणि मोठ्या पड्यांवर अनेक चेहरे आवडीचे असतात. काही त्यांच्या गोड दिसण्यामुळे, काही त्यांच्या गोड हसण्यामुळे तर काही त्यांच्या जबरदस्त अॅक्शनमुळे यामध्ये तिसऱ्या कॅटीगिरीमध्ये बसणारा मुलगा म्हणजे संतोष जुवेकर होय. पूर्वी ईटीव्ही मराठीवर या गोजिरवाण्या घरात ही मालिका यायची या मालिकेत संतोष सर्वात प्रथम झळकला होता.

या मालिकेत देखील त्यांची एका बिनधास्त मुलांची भूमिका केली होती.संतोषचा जन्म 12 डिसेंबर 1984 रोजी झाला. त्याने कॉमर्स विषयात पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे अभिनयाची त्याला चांगली जाण होती.

पण संतोषला कधीच वाटले नव्हते की तो पुढे जाऊन नाटक आणि चित्रपट यामध्ये करियर करेल. संतोषला खरा सुरू गवसला तो म्हणजे आणि मकरंद या नाटकातून. या नाटकातून त्याला त्यांची पहिली मालिका मिळाली ती म्हणजे ह्या गोजिरवाण्या घरात.

या मालिकेत त्याने शेखर परांजपे ही भूमिका साकारली. ह्या भूमिकेमुळे तो घराघरात पोहचला. वादळवाट ही मालिका देखील नंतर त्याने केली. झेंडा, मोरया, मॅटर यासारखे त्यांनी अनेक सिनेमे केले. ते सिनेम गाजले देखील.

यासर्व मालिका आणि सिनेमात त्याने टपोरी भूमिका केल्या पण शाळा या सारख्या सिनेमात मात्र त्याने साध्या सरळ भूमिका केल्या. त्याने अनेक मराठीतील मोठ्या दिग्दर्शका सोबत काम केले.

केदार शिंदे,महेश मांजरेकर, अवधूत गुप्ते.त्याला मराठीतील अॅंग्री यंग मॅन म्हटलं जातं. हे सर्व करत असताना तो पुन्हा छोट्या पडद्यांकडे वळाला तेथे त्याने असं सासर सुरेख बाई ही मालिका केली ही मालिका देखील प्रचंड गाजली. संतोष पुन्हा सामान्य लोकांच्या घरा- घरात आणि मनामनात जाऊन पोहचला.

पण हे सर्व करत असताना त्यांच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात त्याने प्रचंड संघर्ष केला आहे. संतोष मागच्या आठवड्यात झी मराठीवरील किचन कल्लकार या रीयालिटि शोमध्ये आला होता. या शोमध्ये दर आठवड्याला अनेक प्रसिद्ध लोक येतात आणि त्यांचे किचन कौशल्य दाखवतात.

मागील आठवड्यात संतोष जुवेकर देखील आला होता. कोणताही कलाकार सहज मोठा होत नाही. त्यामागे संघर्ष असतो. संतोषचा संघर्ष देखील त्याने मांडला. तो म्हणाला अभिनयाची सुरुवात केल्यानंतर मी मुंबईत राहायचो. पैसे कमी असायचे म्हणून कधी या मित्राकडे, कधी नातेवाईकांकडे जेवायला जायचो. पण रोज कोण तुम्हाला जेवायला देणार. मग मी खार स्टेशनला 20 रुपयांत एक थाली मिळत असे तिथे मी जेवायचो.

3 पोळ्या, भाजी आणि डाळ- भात,कांदा, लिंबू, लोणचं असं जेवण मिळायचं. कोणी विचारलं तर सांगायचो लीलामध्ये बसलो. असं खोटं सांगायचो.असं संतोष म्हणाला. आज संतोष मराठील एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याने त्यांच्या कष्टाने स्वताचे नाव कमावले आहे.