सोशल मीडियामुळे आजकाल अनेकजण प्रचंड प्रसिद्ध झाले आहेत. काहीजण तर रातोरात स्टार झाले आहेत.फेसबुक, युट्यूब यामुळे अनेकांना नवीन रोजगार मिळालेला आहे. पण सोशल मीडियावर प्रसिद्ध होणे इतके सोप्पे देखील नाही. कारण तुमच्या कडे चांगला कंटेट असावा तसेच सातत्य देखील असावे.
मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एक जोडपं आणि त्यांची छोटी मुलगी प्रचंड व्हायरलं होत आहेत. हे जोडपं आहे. गणेश शिंदे त्यांची पत्नी योगीता आणि त्यांची लहान मुलगी शिवानी. सोलापुर जिल्ह्यातील मोहळ येथे हे कुटूंब राहत, गणेश शिंदे हे आधी प्लंबरचे काम करत पण लॉक डाऊन झाले आणि त्यांचा होता नव्हता तो रोजगार देखील गेला.
गणेश आणि त्यांची पत्नी योगीता यांनी त्या काळात टिक-टॉक विडियो बनविण्यास सुरुवात केली. त्यांच्या साध्या पत्र्याच्या घरातून ते विडियो बनवत असतं. आधी नवरा बायको यांचे विनोदी विडियो बनवत असतं.
त्यांना टिक-टॉकवर अमाप प्रसिद्धी मिळाली. पण अचानक टिक-टॉक बंद झाले आणि आता पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडला. गणेश यांनी लगेच त्यांचा मोर्चा युट्यूबकडे वळविला. आता यूट्यूब त्या बरोबरच फेसबुकच्या माध्यमातून या दोघांनी लाखों फॉलोवर्स जमा केले आहेत.
आता त्यांची मुलगी शिवानी देखील त्यांच्यासोबत विडियो बनविते. रोजच्या जीवनातील हलके-फुलके विनोद असणारे विडिओ ते बनवत असल्यामुळे अनेकांना त्यांचे विडियो आवडतात. या कुटुंबाने यूट्यूबच्या माध्यमातून मिळलेल्या पैशांतून सुंदर असे घर देखील बांधले आहे. नवीन टीव्ही देखील घेतला, या बरोबरच फ्रीज आणि घरातील इतर फर्निचर, लॅपटॉप, आणि आयफोन देखील. त्यामुळे सोशल मीडियावर हे दोघे ट्रोल होऊ लागले.
नुकतीच या दोघांनी एक अलिशान अशी चार चाकी घेतली. अनेकांनी त्यांची ही प्रगती पाहून त्यांचे कौतुक केले, तर काहीनी प्रेमळ सल्ला देखील दिला, पैसे उडविण्यापेक्षा एखादा व्यवसाय करा, मुलीच्या शिक्षणासाठी बचत करा, त्यांना उत्तम शिक्षण द्या, असे प्रेमळ सल्ले देखील दिले.
काही लोकांनी मात्र त्यांच्या या गाडीच्या पोस्टवर थेट टीका केली. काहीनी प्रश्न विचारले इतके पैसे आले कुठून, काही म्हणाले बायकोच्या डीलेव्हरीला देखील पैसे नव्हते, सर्वांना पैसे मागत होता मग आता अचानक कुठून आले पैसे, काही लोकांनी तर गणेशला चक्क फोन करून धमक्या दिल्या.
इतक्या सर्व प्रतिक्रिया आल्यानंतर गणेशने त्यांच्या कारमधून एक विडियो बनवून पोस्ट केला. या विडियोमध्ये त्याने सर्वप्रश्नाची उत्तरे दिली. तो म्हणतो तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही सर्व काही मिळवले आहे. यूट्यूबला जर मिलियनमध्ये व्यूज मिळाले तर तुम्हाला त्यातून चांगले पैसे मिळतात. आम्हाला देखील युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळाले आहेत. काही जाहिराती यातून देखील पैसे मिळाले आहेत.
काही ठिकाणी आम्हाला कार्यक्रमाला बोलावलं जातं त्यातून देखील काही पैसे मिळतात. हे सर्व पैसे जमा करून आम्ही ही चार चाकी गाडी घेतली आहे. असं स्पष्टीकरण गणेश आणि योगीता यांनी दिलं आहे . गणेश आणि योगीता सोशल मीडियावर जितके प्रसिद्ध आहेत,तितकीच त्यांच्यावर टीका देखील होत असते.
आधी ते पत्र्याच्या घरात राहत होते तेव्हा देखील त्यांच्या घरांमध्ये प्रचंड पसारा आणि घाण होती, त्यावरून देखील अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. काही दिवसानंतर त्यांनी घर बांधले पण त्या घरात देखील तितकाच पसारा असतं त्यामुळे अनेकजण त्यांना ट्रोल करत.
अलीकडे अनेक कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख आकर्षण म्हणून बोलावलं जातं. योगीतावर सर्वाधिक टीका केली जाते, तसेच त्यांची मुलगी शिवानी ही लहान असून देखील तिच्याकडून रील्स बनवत असल्यामुळे देखील अनेकांनी टीका केली होती. योगीता आणि गणेश नुकतेच पुण्यात आले होते, पुण्यातून परताना त्यांनी हा विडियो बनवून पोस्ट केला आहे. या विडियोवर अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तुम्ही योग्य मार्गावर आहात, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असे म्हटले आहे.