Home » अल्लू अर्जुन देखील झाला श्रेयस तळपदेच्या आवाजाचा फॅन, म्हणला श्रेयसजी तुमचा आवाज..
Articles Celebrities Entertainment

अल्लू अर्जुन देखील झाला श्रेयस तळपदेच्या आवाजाचा फॅन, म्हणला श्रेयसजी तुमचा आवाज..


टॉलीवूडचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनचा सिनेमा पुष्पा याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. तेलगू सोबतच हिंदीमध्ये देखील या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात अल्लू अर्जुनचा डान्स, त्यांची अॅक्टिंग, त्यांचे डायलॉग प्रेक्षकांना तूफान आवडले आहेत.

पुष्पा हिंदीत देखील तितकाच गाजला आहे. अल्लू अर्जुनला हिंदीमध्ये आवाज हा आपला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे यांनी दिला आहे.हिंदीमधील श्रेयसचे डायलॉग खूप गाजले आहेत. नुकतीच अल्लू अर्जुनने एका चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत अल्लू अर्जुनने श्रेयस तळपदेचे आभार मानले आहेत. तसेच त्याला भेटण्याची आशा देखील केली आहे.

श्रेयसने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा विडियो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. या विडियोमध्ये एक रीपोर्टर अल्लू अर्जुनला विचारतो की हिंदीमधील रिमेकला तुम्हाला श्रेयस तळपदेचा आवाज मिळाला आहे. तेव्हा अल्लू अर्जुन म्हणतो की हो मला हे माहीत आहे की श्रेयसजी यांनी यासाठी सुंदर आवाज दिला आहे.

मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. लवकरच आपण भेटू अशी अपेक्षा करतो. ऑन कॅमेरा मी तुमचे आभार मानतो. पुष्पा या पात्राला स्वता पूर्णपणे झोकून देऊन काम केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. श्रेयसने देखील हा विडियो पाहून अल्लू अर्जुनचे धन्यवाद दिले आहेत.

पुष्पा चित्रपटाच्या हिंदीसाठी माझा आवाज योग्य आहे असा विचार केल्याबद्दल मनीष शहा तुमचे व माझ्या आवाजातील सुधारणेसाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी डबिंग डायरेक्टर अब्दुल तुमचे देखील मनापासून धन्यवाद. श्रेयसने प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभार तुमचे असचे प्रेम राहू द्या.