Home » आनंद महिंद्रा यांनी या फोटोला वर्षातील बेस्ट फोटो म्हणून नावाजले आहे
Articles झाल कि व्हायरल!

आनंद महिंद्रा यांनी या फोटोला वर्षातील बेस्ट फोटो म्हणून नावाजले आहे


देशांतील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मिडियावर प्रचंड अँकटिव्ह असतात. त्यांना टॅलेंटची चांगली पारख आहे. ते त्यांना ज्या गोष्ट पटतात,आवडतात त्या गोष्टीची ते कदर करतात. अनेकांनी त्यांनी बक्षिसे देखील दिली आहेत. काहीना नोकऱ्या देखील दिल्या आहेत.

आनंद महिंद्रा त्यांच्या दिलखुलासपणासाठी चर्चेतअसतात. आनंद महिंद्रा यांनी एक फोटो ट्विटरवर शेअर केला, या फोटोला त्यांनी 2021 मधील सर्वात उत्तम फोटो आहे असे म्हटले आहे. आता आपण जाणून घेऊया आनंद महिंद्रा यांनी या फोटोला सर्वात उत्तम फोटो का म्हटले आहे.

या फोटोमध्ये एक मुलगा हातगाडीवर बसला आहे, त्यांनी शाळेचा गणवेश घातला आहे. आणि तो अभ्यास करत आहे. आनंद महिंद्रा म्हणतात या फोटो पाहून कोणीही भावूक होईल.त्यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे,हा माझा वर्षातील सर्वात आवडता फोटो आहे, क्षमा करा मला हा फोटो कोणी काढला आहे हे देखील मला माहीत नाही.

त्यामुळे मी फोटोग्राफरला क्रेडिट देऊ शकत नाही. हा फोटो मला माझ्या इनबॉक्समध्ये दिसला. आशा, मेहनत आणि आशावाद यावर आपण जगत असतो. हा फोटो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केल्यानंतर काही वेळात या फोटोला लाखों लाईक्स् मिळाले.

हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला.या फोटोला 31 लाखांहून अधिक लाईक्स् मिळाले आहेत.तीन हजार लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे.अनेकांनी यावर कमेन्ट केल्या आहेत,एका युजरने लिहिले आहे, सर या फोटोमध्ये गरीबी आणि लाचारी दिसत आहे.त्यावेळी एका युजरने लिहिले, या फोटोमध्ये आशा आहे.