ऑस्कर हा चित्रपट विश्वातील सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. ऑस्करकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते. कालचा ऑस्कर पुरस्कार सोहळा मात्र प्रचंड गाजला. विल स्मिथ याला सर्वात उत्तम अभिनेत्यांचा पुरस्कार मिळाला, स्मिथ पुरस्कार घेण्यासाठी मंचावर देखील गेला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन क्रिस रॉक करत होता.
विल स्मिथ अचानक चिडला आणि त्याने सूत्रसंचालक क्रिसवर हात उचलला. त्यांच्या कानशिलात लगावली. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे. स्मिथने का कानशिलात लगावली असेल असा प्रश्न सर्वांना पडला, तर त्यांचे झाले असे क्रिसने स्मिथच्या पत्नीवर एक विनोद केला हा विनोद स्मिथला काही पटला नाही.
Wow. Will Smith just punched Chris Rock live during the Oscars. pic.twitter.com/RRDMHLtp6S
— The Post Millennial (@TPostMillennial) March 28, 2022
त्याला प्रचंड राग आला. क्रिसने जी.आय.जाने सिनेमावरून विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली. जी.आय.जाने सिनेमात जेडाला टक्कल असल्यामुळे घेतलं होतं, पण जेडाने चित्रपटांसाठी टक्कल केले नव्हते तर तिला आधी पासूनच एक आजार आहे, ज्या आजारात मोठया प्रमाणात केस गळतात.
आलोपीसीका हे त्या आजारांचे नाव आहे. स्मिथला त्यांच्या पत्नीवर केलेला हा विनोद अजिबात आवडला नाही, त्याला प्रचंड राग आला त्याने सूत्रसंचालकाला शिवगाळी केली आणि त्यांच्या कानशिलात वाजविली.हा व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे.स्मिथने कानाशिलात वाजवल्या नंतर स्मिथ त्याला म्हणाला पुन्हा माझ्या पत्नीबद्दल असे बोलू नकोस, क्रिस म्हणाला पुन्हा नाही असे बोलणार.