Home » मुंबई पोलिसांचा नाद खुळा, बराक ओमाबा देखील 11 मिनिटे वाहनात अडकून बसले होते.
Articles आपलं राजकारण खास किस्से

मुंबई पोलिसांचा नाद खुळा, बराक ओमाबा देखील 11 मिनिटे वाहनात अडकून बसले होते.


मुंबई पोलिस त्यांच्या शौर्यासाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. यांचा अनुभव अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओमाबा यांना देखील आला आहे. 2010 मध्ये बराक ओमाबा भारत दौऱ्यावर होते. 7 नोव्हेंबर 2010 रोजी ते सेंट झेवियर्स कॉलेजला भेट देणार होते. ओमाबा याची स्वतची अशी वेगळी सुरक्षा व्यवस्था होती, त्यामुळे मुंबई पोलिसांना इतर सुरक्षा पाहण्यास सांगितले होते.

ओमाबा कॉलेजला भेट देणार त्या अगोदर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्या कॉलेजच्या इमारतीत त्यांचे मेटल डिटेक्टर बसविले. या गोष्टीला मुंबई पोलिस डीसीपी के. एम. मल्लिकाजुन प्रसन्ना यांनी आक्षेप घेतला. त्यांनी त्या जागी मुंबई पोलिसांचे डोअर मेटल प्रेम लावले. ओमाबा येणार त्या दिवशी कॉलेजच्या आवारात पुन्हा बंदूकधारी अमेरिकन सुरक्षा अधिकारी दिसले. ही तैनाती पूर्णपणे चुकीची आहे असे म्हणणे डीसीपी प्रसन्ना यांनी मांडले. त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला. प्रसन्ना यांनी सांगून देखील अमेरिकन सुरक्षा कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली. त्यांना परिसर सोडण्यास सांगितले.

अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांनी देखील त्यांची हत्यारे प्रसन्ना यांच्यावर रोखली. त्यावेळी नेमके ओमाबा सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये येण्यासाठी निघणार होते. परंतु प्रसन्ना आणि दयाल यांनी ओमाबा यांच्या ताफ्यास निघण्यास परवानगी दिली नाही. एक मोठे अधिकारी दयाल यांनी अमेरिकेत फोन लावून तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना प्रसन्ना यांचे मत मानावे लागले.

अमेरिकेने त्यांची सुरक्षा व्यवस्था मागे घेतली. हे सर्व होईपर्यत ओमाबा यांना तब्बल 11 मिनिटे कारमध्ये बसून राहावे लागले होते. प्रसन्ना यांचे म्हणणे होते की जर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अमेरिकेचे सुरक्षा रक्षक असते तर भारताबद्दल जगासमोर चुकीचा संदेश गेला असता, तो असा की भारत व्हीआयपीचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे.