Home » “मॅरेथॉनमध्ये धावून पोटांची खळगी भरणाऱ्या आळकुटी गावच्या भंडारे भगिनी
Articles खास तुमच्यासाठी! खेळ-कुद झाल कि व्हायरल!

“मॅरेथॉनमध्ये धावून पोटांची खळगी भरणाऱ्या आळकुटी गावच्या भंडारे भगिनी

मागील काही वर्षांपासून मॅरेथॉन भारतात फार गाजत आहे. पूर्वी मॅरेथॉन फक्त परदेशांत होत पण आता भारतात देखील मोठ्या- मोठ्या मॅरेथॉन घेतल्या जातात. आरोग्य चांगले राहावे आणि लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी मॅरेथॉन आयोजित केल्या जातात पण पारनेर तालुक्यातील आळकुटी गावातील शीतल भंडारे आणि तीच्या बहिणी मात्र वेगळ्या कारणांसाठी मॅरेथॉन मध्ये धावतात, त्या त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी मॅरेथॉन धावतात.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण शीतल आणि तीच्या आणखी दोन बहिणी यांनी आज पर्यत अनेक मॅरेथॉन जिंकून पदके मिळवली आहेत पण त्यांना या पदकापेक्षा मिळणारे मानधन अधिक महत्वाचे वाटते. शीतल, भागयश्री आणि साक्षी आज अनेक मुलींसाठी आदर्श ठरत आहेत.

शीतल यांच्या वडिलांना तब्बल 15 वर्षांपूर्वी अर्धांगवायुचा झटका आला. त्यामुळे त्यांना एका जागेवर बसावे लागले. शीतल यांच्या आईच्या पदरी तीन मुली आणि एक मुलगा होता. आता या मुलांना कसं लहाणाचं मोठं करायचं या प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकला. त्यांनी मोलमजुरी करण्यास सुरुवात केली.

मुली मोठ्या होऊन हाताखाली येऊ लागल्या त्या देखील हातभार लावत होत्या. शाळेत एकदा मॅरेथॉन होणार आहे असे जाहीर केले शीतल मॅरेथॉनमध्ये धावली तिला पहिले बक्षीस मिळाले. शीतलच्या लक्षात आले आपण जर असेच धावत राहिलो आणि जिंकलो तर नक्कीच आपल्याला चांगले बक्षीस मिळतील. शीतलला तीच्या गुरुजीनी देखील संगितले मॅरेथॉन जिंकलीस तर नक्कीच चांगले बक्षीस मिळेल.

मॅरेथॉन मधून मिळालेल्या बक्षिसांतून शीतल तीच्या बाबांच्या औषधांचा खर्च भागवते तसेच आईला देखील हातभार लावते. शीतल सध्या बीएच्या शेवटच्या वर्षाला आहे , तर भागयश्री पहिल्या वर्षाला लहान साक्षी 10 वीला आहे. मागील सहा वर्ष झाले या तिन्ही बहीण जीव तोडून धावत आहेत.

त्यांच्या गावातील एक शिक्षक त्यांना धावण्याचे प्रशिक्षण देतात. ते त्यांना त्यांच्या परीने मदत करतात. शीतल स्वता देखील जोरदार सराव करते आणि तीच्या बहीणीकडून देखील सराव करून घेते. त्या रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस सराव करतात.

भागयश्री म्हणते आम्हाला आहारासाठी विशेष असं काही मिळत नाही. मोड आलेली कडधान्ये आम्ही जास्त खातो. अंडी आणि मांसाहार यांचा खर्च परवडणार नाही. एकदा या तिन्ही बहिणी परभणीला धावण्यासाठी गेल्या होत्या. जाताना पुरतील इतकेच पैसे त्यांच्याकडे होते, त्यांना परत घरी येण्यासाठी तेथील स्पर्धा जिंकणे गरजेचे होते.

जर त्या ती स्पर्धा जिंकल्या नसत्या तर मात्र त्यांना तेथेच रहावे लागले असते. घरी परतण्यासाठी आणि पुढचे काही दिवस भागतील यासाठी पैसे मिळावेत म्हणून तिघी बहिणी तूफान पळाल्या आणि जिंकल्या देखील.या तिन्ही रोज 10 ते 4 शेतात मजुरी करतात आणि 4 ते 6 सराव करतात.

भविष्यात तिघीना देखील क्लास वन ऑफिसर बनायचे आहे. भागयश्रीला ऑलंम्पिकमध्ये देशांसाठी पदक जिंकायचे आहे. त्यासाठी लागणारी मेहनत आणि कष्ट करण्याची संपूर्ण तयारी भाग्यश्रीची आहे.