Home » उत्तर प्रदेशात भाजपच, पंजाब आप कडे?
Articles आपलं राजकारण

उत्तर प्रदेशात भाजपच, पंजाब आप कडे?


सध्या देशांत निवडणुकीचे वारे वाहत आहे. निवडणुका आणि निवडणुकांमध्ये होणारे एक्सीट पोल हा नेहमी चर्चेचा विषय असतो. सध्या उत्तर प्रदेश सह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी विविध संस्थांनी एक्सीट पोल जाहीर केले आहेत. सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले आहेत. 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थांनी एक्सीट पोल प्रसिद्ध केले आहेत.

त्यानुसार देशांतल्या सर्वात मोठ्या उत्तर प्रदेशात पुन्हा योगी येणार असल्याची चित्र दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात टाइम्स नाऊ- व्हिटोच्या मते भाजपा 225 तर कॉंग्रेस 9 , सपा 151, बसपा 14 ऑक्सीस -इंडिया टूडे, इंडिया न्यूज, ईटीजी रीसर्च, न्यूज रीसर्च, न्यूज एक्स, चाणक्य यांच्या सर्वांच्या मते भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील. भाजपा नंतर सप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये देखील आप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. आपला 70 ते 90 जागा मिळतील. आप पाठोपाठ कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. उत्तराखंडमध्ये देखील भाजपा आघाडीवर असणार आहे. तेथे देखील भाजपा 37 जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये देखील भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. 10 मार्च या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.