Home » भावा जिंकलं, तुझ्या माणुसकीने काळजाचं पाणी पाणी केलं, भर उन्हात भागवली अनेकांची तहान
Articles झाल कि व्हायरल!

भावा जिंकलं, तुझ्या माणुसकीने काळजाचं पाणी पाणी केलं, भर उन्हात भागवली अनेकांची तहान


सध्या प्रत्येकजण पैसा कमावण्याच्या मागे लागला आहे, प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत पण माणुसकी मात्र माणूस विसरत चालला आहे. मात्र या सर्वांना सिद्धेश्वर गायकवाड मात्र अपवाद ठरले आहेत. त्यांनी अनेकांची मने त्यांच्या माणुसकीने जिंकली आहेत.

गौरी देशपांडे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टला कित्येकांनी लाइक आणि शेअर केले. अवघ्या काही तासात या पोस्टला दहा हजारांहून अधिक लोकांनी लाईक देखील केले. अनेक मराठी फेसबुक पेजेस यांनी या पोस्टला शेअर केले. असं काय होतं या पोस्टमध्ये ज्यामुळे अनेकांनी सिद्धेश्वरचे कौतुक केले.

रविवारी मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. जेव्हा जेव्हा कोंडी होते, तेव्हा अनेक प्रवासी तासन- तास अडकून पडतात. लहान मुले, स्त्रीया, वयोवृद्ध लोक यांचे हाल- हाल होतात. रस्त्यांची पूर्ण कोंडी झाल्यामुळे भर उन्हात लोकांचं पाणी-पाणी होतं. काल देखील केमिकल ट्रक पल्टी झाल्यामुळे मुंबई-पुणे हाइवे पूर्ण जाम झाला होता.

गौरी देखील अडकून पडल्या होत्या, अचानक त्यांच्या समोर अर्ध्या लीटर पाण्याची बाटली आली, ताई पाणी पाहिजे का?गौरी यांनी हो म्हटले आणि पाणी घेतले, पैसे किती देऊ असे विचारले, तो म्हणाला पैसे नको, मी सगळ्यांना पाणी वाटत आहे. गौरी यांना आश्चर्य वाटले, त्यांनी कुतुहलापोटी त्या मुलांचे नाव विचारले, तो म्हणाला सिद्धेश गायकवाड,गाव पांगोळी.

गौरी यांनी त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या, तो म्हणाला 4-5 तास झाले रस्ता पूर्ण टप्प झाला आहे. सगळे एकाच जागी अडकले आहेत. गाडीमध्ये लहानमुले, स्त्रीया, वयोवृद्ध लोक असतात, काहीच्या गाडीत पाणी असते, काहीच्या गाडीत पाणी नसते. जवळचे पाणी गरम झालेले असते, त्यामुळे आम्ही सर्वांना पाणी वाटत आहोत.

सिद्धेश आणि त्यांची बहीण यांची काल अनेकांची तहान तर भागविली पण अनेकांनची मने देखील त्यांच्या माणुसकीने जिंकली. गौरी यांनी सिद्धेशला फोटो काढण्याची विनंती केली पण तो तयार झाला नाही. गौरी यांनी पुन्हा काहीवेळ गप्पा मारल्या आणि नंतर त्याने एक फोटो काढला.

गौरी म्हणतात सिद्धेश फेसबुकवर नाही पण त्यांची गावचे किंवा आजूबाजूचे कोणी असतील त्याने त्यांचा हा फोटो व्हायरलं करा. गौरी म्हणतात आम्ही 3 तास झाले अडकून पडलो होतो, आजूबाजूला एक दुकान किंवा हॉटेल देखील नव्हतं,माझ्या जवळची पाण्याची बॉटल देखील संपली होती, अगदी त्यावेळेस सिद्धेशने माझी तहान भागविली, जागेवर मिळालेले पाणी माझ्यासाठी अमृता समान होते, थॅंक्स सिद्धेश. पाणीवाला दादा तुझे खूप आभार.

गौरी यांची ही पोस्ट खूप व्हायरलं झाली आहे, त्यांच्या या पोस्टला 1 हजारांहून अधिक शेअर्स आले आहेत. सध्या हा पाणीवाला दादा प्रचंड व्हायरलं झाला आहे. सिद्धेशच्या माणुसकीने अनेकांच्या मनात त्यांची वेगळी जागा निर्माण केली आहे.