जेव्हा गुगलचा शोध लागला आणि गुगल अधिक वापरात येऊ लागले, त्या नंतर माणुस गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. कोणतीही माहिती असो किंवा इतर काही सर्व काही आपण गुगलवर शोधून काढतो. गुगलवर सर्व माहिती अगदी सविस्तर मिळते पण मनोरंजन हवे असेल, नवीन काही शिकायचे असेल तर मात्र आपण यूट्यूबवर शोधतो.
काहीजण तर दिवसभर यूट्यूबवर रेसिपी आणि रील्स पाहत बसतात. अनेकांना हा प्रश्न पडतो की यूट्यूबवर विडियो करून कोणाचं पोटं भरतं तर त्याचं उत्तर आहे, अनेक यूट्यूबर आज पूर्णवेळ यूट्यूबवर विडियो बनविण्याचे काम करतात. त्यातून ते उत्तम पैसा कमावतात. ज्या प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा एक आवडता अभिनेता किंवा अभिनेती आहे ,तसेच आता प्रत्येकाचे आवडते यूट्यूबर देखील आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव आहे ते म्हणजे मालेगावच्या छोटू दादाचे,आता तुम्ही विचार कराल या छोटू दादामध्ये वेगळं काय आहे? छोटू दादा कॉमेडी विडियो बनवितो.
तुम्ही यूट्यूबवर छोटू दादा सर्च केलं की तुम्हाला कित्येक विडियो समोर दिसतील. सुरुवातीला तुम्हाला त्यांचे विडियो पाहू वाटणार नाहीत. पण एक विडियो पाहा त्या नंतर तुम्ही शंभर टक्के सर्व विडीओ पाहणार म्हणजे पाहणारचं. जबरदस्त कॉमेडी पाहून तुम्ही लोटपोट होऊन हसाल हे मात्र नक्की.
चला तर आज आपण अशाच छोटू दादाची रियल लाइफ स्टोरी जाणून घेऊया. सर्वात प्रथम कोण आहे छोटू दादा. छोटू दादाचे खरे नाव शफीक छोटू आहे. पण यूट्यूबवर तो छोटू दादा या नावाने ओळखला जातो. यूट्यूबवर तो एखाद्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही. त्यांच्या प्रत्येक विडियोला लाखों हयूज येतात. असे देखील अनेक विडियो आहेत, ज्यांना अब्जो व्यूज आहेत. काही विडियो तर कोटीमध्ये देखील आहेत. हे सर्व शक्य झाले ते फक्त आणि फक्त छोटूच्या कॉमिक टायमिंगमुळे. त्यांच्या विडियोमध्ये तो सुरुवातीपासुन अगदी शेवट पर्यत तितकाच भन्नाट कॉमेडी करतो.
शफीक छोटू यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1991 रोजी मालेगाव येथे झाला. आता तो 28 वर्षाचा आहे.शफीकची ऊंची त्यांच्या वयाच्या हिशोबाने केवळ 4.1 फुट इतकी आहे. कमी ऊंचीमुळे छोटूला खूप चेष्टा सहन करावी लागली. पण तो आयुष्यात निराश झाला नाही.त्यांची त्याच्या गावातील वसिमशी मैत्री झाली. वासिमला यूट्यूबचे आधीपासून वेड होते. छोटूने एका वसिमला विनंती करून स्वताचा एक विडियो बनवून घेतला.वासिमने देखील त्याला संधी दिली.
वसिमने छोटू ह्ल्क नावाने एक विडियो बनविला. लोकांना त्यांचा अभिनय आवडला. त्याच्या कामाचे फार कौतुक देखील झाले. त्याचं नशीब चमकलं त्याला त्या नंतर अनेक यूट्यूब सिरिज आणि शॉर्ट फिल्म यांच्या ऑफर मिळत गेल्या. तो यूट्यूब स्टार बनला. आज यूट्यूबवर छोटू दादाची लोकप्रियता प्रचंड आहे.
तो एका विडियोमध्ये काम करण्यासाठी 1.25 लाख रुपये घेतो. एक यूट्यूब स्टार असून देखील तो इतकी फी घेतो हे विशेष आहे. त्यांचे यूट्यूबवर खानदेशी मुव्ही नावाचे चॅनल देखील आहे. त्यांच्या सर्व चॅनलचे मिळून त्यांचे जवळपास एक कोटी चाहते आहेत. त्याला अनेक चित्रपटांच्या देखील ऑफर आल्या आहेत.
लवकरच तो आपल्याला मोठ्या पडद्यावर देखील दिसेल. तसेच हॉलीवुडमधून देखील त्याला काही ऑफर आल्या आहेत. म्हणजेच काय त्यांची लोकप्रियता किती आहे हे तुम्हाला समजू शकते. छोटूने त्यांच्या कमी ऊंचीचे दुख न करता त्याने त्यांचा वापर करून स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.