Home » मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या जाळ्यात, 11 सदनिका जप्त
Articles आपलं राजकारण

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या जाळ्यात, 11 सदनिका जप्त


महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ईडीच्या जोरदार कारवाया सुरू आहेत. महाविकास आघाडीतील अनेक नेते ईडीच्या रडारांवर आहेत. आता नंबर लागला आहे, मुख्यमंत्र्यांचे मेहुणे आणि रश्मि ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांचा. ठाण्यातील वर्तक नगर विभागातील नीलांबरी अपार्टमेंटमधील श्रीधर यांच्या तब्बल 6 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत.

श्रीधर यांची एकूण 6 कोटी 45 लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर यांच्यावर शेल कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचे आरोप आहेत. नंदकिशोर या एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला शेल कंपनीच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले गेले.

या पैशातून एकूण 11 सदनिका खरेदी केल्या गेल्या. साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ही श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची कंपनी आहे. यामध्ये पुष्पक कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.

पुष्पक ग्रुपची एक कंपनी ही पुष्पक बुलियन ही आहे. पुष्पक बुलीयनच्या माध्यमातून साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांनी या 11 सदनिका खरेदी केल्या आहेत. याआधी देखील पुष्पक ग्रुपची 2017 मध्ये21 कोटी 46 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.