Home » कॉमेडी किंग ते पंजाबचे भावी मुख्यमंत्री, भगवंत मान यांचा बेधडक प्रवास
Articles आपलं राजकारण

कॉमेडी किंग ते पंजाबचे भावी मुख्यमंत्री, भगवंत मान यांचा बेधडक प्रवास


कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली आणि वेगळ्या क्षेत्रात विशेषता क्रीडा, अभिनय क्षेत्रात असलेले बरेच जण राजकारणात असल्याची उदाहरण आपल्याला माहीत आहेत. अशा चेहऱ्यांची त्यांच्या मूळ क्षेत्रात असलेली लोकप्रियता असली तरी राजकारणात ते फार काळ टिकाव धरू न शकल्याची अनेक उदाहरणे आहेत.

पंजाबचे नवज्योत सिद्धू मात्र आपण स्थान टिकवून आहेत. काल निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि या निकालात पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार यश संपादन केले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासातले,भगवंत मान उभे होते. भगवंत मान हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. भगवंत मान हे राजकारणात येण्यापूर्वी ते एक स्टँड अप कॉमेडीन होते. ते विनोदवीर म्हणून पंजाबमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेले मान यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत.

मान यांचा हा प्रवास इतका सोप्पा नसतो. केजरीवाल म्हणतात की आपल्या पार्टीच्या कॅम्पेन अंतर्गत मिळलेल्या 22 लाख प्रतिसादांवरुन भगवंत मान यांना विधानसभा निवडणूकीसाठी मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा म्हणून निवडलं गेलं होतं.

ते म्हणाले की 93 % लोकांनी मान यांना आपली मतं दिली. भगवंत यांचं पूर्वायुष्य काहीसं वादग्रस्त आहे. मात्र कॉमेडी किंग म्हणून लोकांनी त्याला नेहमीच त्यांना डोक्यावर घेतलं.

मान यांचा जन्म पंजाबमधील संग्रूर या गावात झाला. त्या जमान्यात आता सारखं इंटरनेटचं जाळं विस्तारलेलं नव्हतं. तरी मान यांना नेहमी विनोदाचा सुर बिनचूक पकडत आपल्या कॉमिक टायमिंग रसिकांचं मन जिंकलं. युथ फेस्टिवल्स आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.

कुल्फी गरमा गरम सारखे सुपरहिट अल्बम्स त्यांनी दिले. द ग्रेट इंडियन लाफ्ट चॅलेंज या शो मधून देशभरात ओळख मिळण्यासाठी आधी राजकीय उपहासाशी जोडलेल्या आपल्या गावरान बाजाच्या पंजाबी विनोदासाठी ते प्रसिद्ध होते.

2011 सालच्या सुरुवातीला त्यांनी मनप्रीत सिंग बादल यांच्या पीपल्स पार्टी ऑफ पंजाब मध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली. मात्र 2021 मध्ये लेहरा महदारसंघाकडून लढल्या तेथे ते सपशेल हारले. त्या नंतर 2014 साली मार्चमध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.

संग्रूर लोकसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढवली. तेथे ते 2 लाख मतांनी विजयी ठरले. त्या नंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 2017 साली पुन्हा जलालाबाद मध्ये निवडणूक लढवताना सुखबीर सिंग बादल यांच्याकडून निवडणूक हरल्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली.

त्याचं खाजगी आयुष्य देखील खूप वादग्रस्त ठरलं. ते दारूच्या नशेच्या आहारी गेल्याचे आरोप झाले. 2014 साली मान यांनी इराकमध्ये अडकलेल्या पंजाबी नागरिकांच्या स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स भरवली होती,पण त्यावेळी त्यांच्या विचित्र वागणूकीच्या एक विडियोची जास्त चर्चा झाली. या व्हिडीओ ते कोलमडून कारच्या मागच्या भागात जिथे आपण सामान ठेवतो त्यांच्या आत गेल्याचं दिसलं.

ते दारू प्यायले किंवा नैराश्य ग्रस्त असावेत असं बऱ्याच जणांना वाटलं. 2019 साली आम आदमी पार्टीच्या एका सार्वजनिक मीटिंग त्यांनी सर्व समक्ष दारू सोडून दारुला पुन्हा स्पर्श करणार नाही, अशी आपल्या आईची शपथ घेतली. 2018 च्या सुरवातिला अरविंद केजरीवाल यांनी बिक्रम सिंग मजिठीया यांची माफी मागीतल्यावर मान यांनी आप पंजाब संयोजक पदावरून राजीनामा दिला होता.

2016 साली मान यांनी सरकारी शाळांच्या शिक्षकांची खिल्ली उडवल्यानंतर सोशल मिडियावर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसल्या होत्या. टीकाकारांनी त्यांच्या दारूच्या व्यवसनांवर बऱ्याचदा त्यांच्यावर टीका केली आहे. 2015 साली भगवंत मान आणि त्यांची पूर्वाश्रमाची पत्नी इंदरजीत कौर यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. पंजाबसाठी काम करायचं म्हणून आपण बायकोला सोडत आहोत असं त्यांनी त्यावेळी फेसबुकवर संगीतलं होतं.

मान यांच्या या प्रवासात त्यांची पत्नी इंदरजीत या त्यांच्या पाठीशी भककपणे उभ्या राहिल्या होत्या. इतक्या वेळा विचित्र वागल्यानंतर त्यांच्या तल्लख बुद्धीमुळे आणि त्यांच्या भाषणामुळे तेथील गर्दी खेचून आणणारा आपचा चेहरा आहेत. ते अगदी तात्पुरत्या टप्प्यांवरून बोलत असताना गर्दीसोबत त्यांची जबरदस्त केमिस्ट्री असते. बऱ्याच सार्वजनिक मीटिंगमध्ये लोकांनी आपच्या बाकी वकत्यांच्या आधी मान यांना बोलायची परवानगी द्यायला भाग पाडल