Home » शाहरुख खरंच थुंकला का? त्यांचा काही वेगळा अर्थ होतो
Articles Entertainment Uncategorized

शाहरुख खरंच थुंकला का? त्यांचा काही वेगळा अर्थ होतो


मागील अनेक दिवसापासून वाद आणि शाहरुख खान हे समीकरण पक्क ठरलेलं आहे. आर्यन खानचा वाद तर सर्वांना माहीत आहे. सध्या तर शाहरुख करायला जातो एक आणि होतं एक असं झालं आहे. आता हेच पहा शाहरुख खान काल लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेला होता.

तेथील एक फोटो सध्या प्रचंड व्हायरलं होत आहे. या फोटोमध्ये शाहरुखने मास्क काढून फुंकर मारली आहे, पण सोशल मिडियावर मात्र हा फोटो वेगळ्याच कारणांसाठी व्हायरलं होत आहे, काहीनी शाहरुख तेथे थुंकला आहे असे म्हटले आहे. आता आपण या फोटो मागील सत्य जाणून घेणार आहोत.

जगप्रसिद्ध गायत्री लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. लता दीदी यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर शिवाजी पार्कवर आले होते. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी ते शरद पवार तसेच बॉलीवुडमधील अनेक दिग्गज मान्यवर आले होते. शाहरुख देखील आला होता. शाहरुख देखील आला अनेकांना आश्चर्य वाटले कारण शाहरुख पडद्यावर जरी रोमान्स हीरो असला तरी खऱ्या आयुष्यात मात्र तो थोडासा फटकळ आहे. काहीच्या मते तो त्यांचा फायदा असेल तरच येतो.

काल मात्र शाहरुख पांढरा टी शर्ट आणि काळा मास्क लावून आला होता. त्यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवा समोर पुष्प अपर्ण केले आणि त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार त्याने तिथं उभा राहून लता दीदी यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली. शाहरुखने प्रार्थना केली आणि मास्क काढून तोंडातून थोडासा फुत्कार काढला. प काहीनी अशी वावडी उठविली की शाहरुख तेथे थुंकला. मग काय सुरू झालं ट्रोलिंग अनेकांनी शाहरुखवर टीका केली.

तो किती चुकीचा वागला. अशा चर्चा सुरू झाल्या पण शाहरुखने मात्र या चर्चेकडे लक्ष दिले नाही. त्या नंतर मुस्लिम धर्माचा अभ्यास असणारे काही व्यक्ती यांनी मात्र शाहरुख थुंकला नसून त्याने फक्त फुत्कारा काढला असे स्पष्टीकरण दिले. या फुत्कारांचा अर्थ असा होतो की, प्रार्थना केल्यानंतर फुत्कारा काढल्यामुळे प्रार्थना सार्थकी लागते.

मृत व्यक्तीच्या आत्मयास सदगती लाभते. सोशल मिडियावर मात्र दोन गट तयार झाले एक गट म्हणजे शहरुख कसा थुंकला आणि दूसरा गट म्हणजे तो कसा चुकीचा आहे. फेसबुक व इतर समाज माध्यमावर असे घटक असतात. जे काही होवो टीका करत असतात. आता हेच पहा ना शाहरुखचे उदाहरण.