Home » जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला, अमेरिकेत गेला, राजू आज जगप्रसिद्ध अशा फोर्ब्स यादीत झळकला.
Articles खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला, अमेरिकेत गेला, राजू आज जगप्रसिद्ध अशा फोर्ब्स यादीत झळकला.


शेतकऱ्यांच परी जगात भारी असतात. कष्ट आणि जिद्द आणि आजूबाजूच्या समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या एका गोष्टीवर राजू मागच्या वर्षी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी पात्र ठरला. तेव्हा संपूर्ण देशांत राजूची चर्चा झाली. आता तुम्ही म्हणालं की ही स्कॉलरशिप काय इतकी विशेष आहे, लंडन मधील चेवनिंग ,मार्फत ही स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप मिळवण्याची प्रक्रिया अतिशय कडक आहे. म्हणजेच काय यांचे अनेक राऊंड होतात. त्यानंतर तुम्ही पात्र आहात का नाही हे ठरवलं जात. या स्कॉलरशिपसाठी जगभरातून तब्बल 63000 हजार अर्ज आले होते.

त्यातून राजूची निवड करण्यात आली होती. राजू सध्या लंडनमध्ये या स्कॉलरशिपचा अभ्यास करत आहे. तेथे तो सोस विद्यापिठात लडंनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज हा विषय शिकत आहे. फेब्रुवारीमध्ये लडंन मधील फोर्ब्स मासिकाने 30 अंडर 30 याची यादी जाहीर यामध्ये राजुचा समावेश करण्यात आला. फोर्ब्सने राजूची यशोगाथा देखील मांडली आहे. यामुळे राजूचं संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. घरात कोणालाही शिक्षणाचा गंध नाही, आई-वडील शेती करतात, अतिशय सामान्य घरात जन्मलेला राजू आज चर्चेचा विषय ठरत आहे.

राजू एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करतो. त्यांच्या या कामाची दखल घेत आणि त्यांचे पुढील दहा वर्षांचे तो काय सामाजिक काम करणार आहे हे ध्येय पाहून त्यांची स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली. राजू त्यांच्या एकलव्य फाऊंडेशन मार्फत अनेकांना करियरविषयी मार्गदर्शन देखील करतो.

शिक्षणासाठी ज्या काही चौकटी आहेत, त्यातून बाहेर पडत प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी राजू काम करत आहे. जगामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचीएक वेगळी ओळख आहे पण आता राजूने आणखी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजूचे आई- वडील शेती करतात. राजूचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेत झाले. परिस्थितिमुळे त्याला बाहेर शिकणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

पदवी शिक्षण घेणे देखील इतके सोप्पे नव्हते. त्यांच्या संपूर्ण खानदानातील तो पहिला ठरला ज्याने पदवी पूर्ण केली आहे. भटक्या समाजातील मुलगा आज संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे असे काम करत आहे. येत्यादशकात तळागळातील मुलांना देखील जागतिक स्कॉलर घडवूया यासाठी मोहीम आखूया असे ट्विट राजू याने काल केले आहे. आम्हाला आमच्या राजुचा सार्थ अभिमान आहे, त्यांच्या सारखे आणखी राजू तयार व्हावेत ही अपेक्षा ही प्रतिक्रिया राजुच्या आई- वडिलांनी व्यक्त केली आहे. राजुला मिळालेली स्कॉलरशिप ही तब्बल 45 लाख इतकी आहे.

राजु अभ्यासत देखील तितकाच हुशार आहे. त्याने पहिल्या झटक्यात नेट- सेट देखील पास केल्या आहेत. त्याने टाटा सामाजिक विज्ञान संस्था या संस्थेतून ग्रामीण विकास विषयात पदवी घेतली आहे.

त्याने मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम केले आहे. राजुने आता पर्यत 100 हून अधिक विद्यार्थी यांना भारतातील नमांकित विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी मदत केली आहे. राजुचा हा प्रवास थक्क करणारा आहे. एक सर्वसामान्य मुलगा ते जगप्रसिद्ध अशा फोर्ब्स यादीत झळकनारा मुलगा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.