Home » लिफ्टची ऑफर नाकारणाऱ्या मुलांचं भावस्पर्शी उत्तर .. एकदा जरूर वाचा
Articles खास किस्से झाल कि व्हायरल!

लिफ्टची ऑफर नाकारणाऱ्या मुलांचं भावस्पर्शी उत्तर .. एकदा जरूर वाचा

सोशल मिडियावर कधी ही काहीही व्हायरलं होऊ शकतं. मागील दोन दिवसांपासून असाच एक विडियो सध्या व्हायरलं होतं आहे. हा विडियो पाहून प्रत्येकजण भावुक होत आहे. या बरोबरच उर देखील अभिमानाने फुलून येत आहे. हा विडियो नक्की काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत.

विडियोमध्ये जवळपास रात्रीचे 12 वाजलेले आहेत. एक युवक रस्त्याने वेगाने धावत आहे. तेवढ्यात एक कार चालक येतो आणि त्या मुलाला लिफ्ट ऑफर करतो. तो मुलगा ती लिफ्ट नाकारतो. आता या मुलाची खरी कहाणी समोर आली आहे .

हा विडियो रात्री बारा वाजता दिल्ली जवळील नोएडा येथे विनोद कापरी यांनी शूट केला आहे. विनोद कपरी यांनी हा विडियो त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

विनोद कापरी त्यांच्या कार मधून चालले होते, तेव्हा एक मुलगा खांद्यावर बॅग घेऊन धावत होता. कापरी यांनी त्या मुलाला लिफ्ट ऑफर केली, पण त्याने ती नाकारली. त्या नंतर विडियोत त्यांनी त्या मुलांशी गाडी चालवत संवाद साधायला सुरुवात केली.

प्रदीप मेहरा असं तो धावणारा मुलगा स्वताचं नावं सांगतो. प्रदीप दररोज दहा किलोमीटर धावतो. रात्रीचे बारा वाजले होते आणि घरी जावून तो जेवण बनविणार होता. त्या नंतर तो जेवणार होता. तो आपल्या मोठ्या भावासोबत राहतो. त्यांची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दररोज प्रदीप दहा किलोमीटर धावत घरी जातो.पुढे जाऊन त्याला सैन्यातमध्ये भरती व्हायचे आहे. त्यासाठी त्याने धावण्याचा सराव सुरू केला आहे. विनोद त्या मुलाला अनेकदा कार मध्ये बसण्याची विनवणी करतात पण तो मात्र तयार होत नाही.

विनोद त्या मुलाला त्यांच्या सोबत जेवण्याची ऑफर देखील करतात पण तो नाही म्हणतो. ते त्या मुलाला म्हणतात इतकं धावत जाऊन. तू थकशील, पुन्हा घरी जाऊन जेवण बनविणार फार वेळ लागेल, आता बारा वाजले आहेत. आपण एकत्र जेवूया. तो मुलगा विनोद यांना म्हणतो, मी जर तुमच्या सोबत जेवलो तर माझा मोठा भाऊ काय खाईल.

विनोद यांनी हा विडिओ शेअर करत हेच खरं सोनं असं कॅपशन दिलं आहे. तुम्ही या मूलाने लिफ्टला नकार दिला हे पाहून तुम्ही नक्कीच त्यांच्या प्रेमात पडाल.