Home » शेतकऱ्यांची पोर, पोलिसांत नोकरी आणि आता बनली मिस महाराष्ट्र
Articles खास तुमच्यासाठी!

शेतकऱ्यांची पोर, पोलिसांत नोकरी आणि आता बनली मिस महाराष्ट्र

माझे आजोबा कुस्तीपट्टू होते,त्यांना पाहून मला कुस्ती खेळण्याची प्रेरणा मिळाली.त्या नंतर मी कुस्तीच्या रिंगणात जॉइन झाले.पुढे 2010 साली मी पोलिस दलात खेळाडू म्हणून जॉइन झाले. मला खूप आधीपासून सौंदर्य स्पर्धेत सहभागी व्हायचे होते पण ते शक्य होत नव्हते. मागील महिन्यांत पुण्यात झालेल्या मिस महाराष्ट्र स्पर्धेत सहभागी झाले आणि अनेक दिवसांपासून असलेले स्वप्न पूर्ण झाले. हे सांगताना प्रतिभा यांना त्यांच्या आता पर्यतच्या सर्व प्रवासाची आठवण झाली.

मागील दोन दिवसापासून महाराष्ट्रात प्रतिभा सांगळे हे ना प्रचंड चर्चेत आहे. कारण प्रतिभा या मिस महाराष्ट्र बनल्या आहेत. आता तुम्ही विचार कराल यामध्ये वेगळं काय, दरवर्षी ही स्पर्धा होते आणि कोणीना – कोणी मिस महाराष्ट बनतं. पण प्रतिभा चर्चेत असण्याचं कारण म्हणजे प्रतिभा या पोलिस कॉन्स्टेबल आहेत. प्रतिभा या मूळच्या बीड जिल्ह्यातील आष्टी गावच्या त्यांचे वडील शेती करतात. तर प्रतिभा सध्या बीड पोलिस मध्यवर्ती कार्यालयात पोलिस कॉन्स्टेबल आहेत.

विशेष म्हणजे प्रतिभा या 2010 पासून पोलिस सेवेत असून देखील त्यांनी त्यांचा छंद जोपासला आहे. मागे एकदा देखील त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला तो तेव्हा त्या फस्ट रुनरअप ठरल्या होत्या. पुन्हा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या मिस महाराष्ट्र झाल्या. प्रतिभा सोशल मिडियावर प्रचंड अकटीव्ह असतात. त्या त्यांचे सुंदर सुंदर फोटो तेथे त्यांच्या फोलोवर्ससाठी अपलोड करत असतात. प्रतिभा यांचे वडील शेती करतात, प्रतिभा यांनी फॅशन प्रमाणेच कुस्तीचे मैदान देखील गाजविले आहे.त्यांनी अनेक कुस्तीच्या स्पर्धा देखील जिंकल्या आहेत.

प्रतिभा म्हणतात, आमच्या भागातील बहुतांशी लोक हे ऊसतोड कामगार आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीना उत्तम शिक्षण द्यावे आणि त्या नंतर त्यांचे लग्न करावे. मुलीना शिक्षित करणे फार गरजेचे आहे. प्रतिभा स्वता देखील भविष्यात या विषयांवर काम करणार आहेत. भविष्यात प्रतिभा यांना मिस युनिवर्स देखील व्हायचे आहे. त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे. प्रतिभा बालपणी पासूनच कलेची आवड होती, त्या शाळेत देखील अनेक स्पर्धेत सहभागी होत. गॅदरिंगमध्ये देखील भाग घेत.