भारताचे शेतकरी खूपच टॅलेंटेड आहे असं आपण गृहीत धरू शकतो. त्याच कारण म्हणजे, शेतकऱ्यांचा लढा व त्यांची जीत सगळ्यांनाच आठवत असेल. पण या आंदोलना दरम्यान त्यांचा असाच एक लढा अमेरिका बरोबर सुरु होता. आणि त्यात त्यांचा विजय सुद्धा झाला होता. आपण बोलत आहे ते भारत भर गाजलेल्या पेप्सिको च्या प्रकरणाबद्दल.
पेप्सिको हि लेज चे (Lay’s) चिप्स बनवणारी अमेरिकन कंपनी आहे. हे चिप्स बनवण्यासाठी हि कंपनी भारतीय शेतकऱ्यांकडून एफएल-२०२७ या बटाटयाचा वापर करते. कारण म्हणजे या प्रकार च्या बटाट्यामध्ये कमी आर्द्रता असते, ज्यामुळे चिप्स फार कुरकुरीत व हलके बनतात. त्यामुळे या कंपनी ने २०१६ साली एफएल-२०२७ या बटाटयाचं पेटंट केलं. यामुळे भारतात कोणतेही शेतकरी या बटाटयाचं उत्पादन करू शकत नव्हते. आणि जरी उगवले तरी ते पेप्सिको कंपनीच या बटाट्याचा वापर करायची.
२०१८ साली गुजरातच्या काही शेतकऱ्यांनी एफएल-२०२७ ह्या बटाटयाच उत्पादन केल्यामुळे ह्या कंपनीने ११ शेतकऱ्यांवर केस केली व दिड कोटी रुपयांची मागणी सुद्धा केली. शेतकऱ्यांच म्हणनं होतं कि आम्ही आमच्या पद्धतीने कोणत्याही बटाट्याची पैदास करू त्यावर निर्बंध लावणारे तुम्ही कोण? गुजरात सरकारने पेप्सिकोशी बातचीत केल्यानंतर २०१९ मध्ये पेप्सिको ने हि केस माघार घेतली. आणि शेतकऱ्यांनी कंपनीला दंड म्हणून एक रुपयाची मागणी केली आणि माफी माघायला सांगितली. कृषी कार्यकर्ता कविता कुरुगांती यांनी पेप्सिको ला दिलेलं पेटंट रद्द करण्याची मागणी केली. व डिसेंबर २०२१ ला हे पेटंट रद्द करण्याचा निकाल लागला. आणि शेतकऱ्यांचा दणदणीत विजय झाला