शेतकरी असलेल्या पित्याला अचानक अर्धांगवायुचा झटका आला, मात्र आरतीने मात्र धाडस दाखवून तीने गाडी चालविली. आरतीने न घाबरता मोटार सायकलवर बसवून आईला पाठिमागे घट्ट पकडायला लावून औट्रम घाटासारखा खडतर प्रवास करीत 100 किमीचा अंतरावर असलेल्या औरंगाबादमधील रुग्णालयात वेळेवर पोहचविले आहे. आरतीच्या या धाडसामुळे तिच्या वडिलांच्या प्राण वाचले आहेत.
आरतीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागदपासून जवळ असलेल्या जामडी येथील शेतकरी असलेल्या संजय परदेशी यांना दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले, आता त्यांची लहान मुलगी आरती, संजय आणि त्यांची पत्नी असे तिघे राहतात. आरती सध्या 12 वीत शिकते. चार दिवसांपूर्वी संजय यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्या समोर प्रश्न उभा राहिला आता काय करायचे?
कारण संजय यांना तत्काळ दवाखाण्यात घेऊन जाणे गरजेचे होते. वाहनांची व्यवस्था देखील होत नव्हती. अखेर आरतीने निर्णय घेतला वडिलांना दुचाकीने घेऊन जायचे. तातडीने ती आईच्या मदतीने वडिलांना मोटार सायकलवरुन दवाखान्यात घेऊन गेली. जामडीपासून औरंगाबाद हे अंतर शंभर किलोमीटर आहे.
ट्रिपल सीट हा प्रवास करणे सोप्पे नव्हते, रस्ता देखील खराब होता. पण आरतीने हिंमत हारली नाही. आरतीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरीतच्या कॉलेजमध्ये देखील तिचा सत्कार करण्यात आला. नागदचा घाट हा तब्बल 8 किलोमीटरचा आहे हा रस्ता अतिशय खराब आहे, तरी देखील आरतीने हे अंतर पार केले. आरतीच्या या धाडसामुळे तिच्या वडिलांचे प्राण वाचले आहेत.