Home » दोस्ताची दुनियादारी, नाशिकच्या पट्ट्याने मित्राला वाढदिवसानिमित्त दिली चंद्रावर एक एकर जमीन भेट
Articles खास किस्से खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

दोस्ताची दुनियादारी, नाशिकच्या पट्ट्याने मित्राला वाढदिवसानिमित्त दिली चंद्रावर एक एकर जमीन भेट


मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे धमाल, मैत्री म्हणजे काहीतरी हटके, मैत्री म्हणजे जिगर. अनेकदा लोक प्रेमासाठी जितकं करत नाहीत तितकं मैत्रीसाठी करतात. प्रेमात पडलेले प्रेमी एकमेकांना चंद्र-तारे आणून देण्याचे वचन देतात. तुझ्यासाठी चंद्र -तारे देखील तोडून आणू शकतो.

हे आपल्या प्रेमिकेला म्हणतात पण नाशिकमध्ये मात्र एका मित्राने त्यांच्या वाढदिवसाला चक्क त्याला चंद्रावर एक एकर जमीन गिफ्ट दिली आहे. आता तुम्ही विचार कराल चंद्रावर एक एकर जमीन काहीतरी काय? अहो खरंच चंद्रावर जमीन खरेदी करता येते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह याने देखील चंद्रावर जमीन घेतली होती. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये असेच एक उदाहरण समोर आले आहे.

दोन डॉक्टर मित्रांनी त्यांची मैत्री एका वेगळ्या पद्धतीने दाखवून दिली आहे. रुपेश हरिशचंद्र नाठे यांनी त्यांच्या मित्रांच्या म्हणजेच डॉ. हषीकेश प्रदीप मुधळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून एक एकर जमीन चंद्रावर भेट केली आहे. इंटरनॅशनल लँड्स अथोरिटी यांच्याकडे खरेदी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

रुपेश नाठे याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम शिवजयंती निमित्त शिव पालखी हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांची सामाजिक कार्यातील कामगिरी पाहून त्याला हे अनोखे गिफ्ट दिले आहे. रुपेशला हे अनोखे गिफ्ट मिळाल्यामुळे संपूर्ण महराष्ट्रात या घटनेची चर्चा आहे. मित्राला असे हटके गिफ्ट देण्याची ही पहिलीच घटना असेल.