दहावी आणि बारावीच्या परीक्षेवरून सध्या राज्यभर एकच गदारोळ सुरू आहे. विद्यार्थी म्हणतात की परीक्षा ऑनलाइन घ्या आणि शिक्षक आणि पालक मात्र ऑफलाइन परीक्षा घ्या असा आग्रह करत आहेत. विद्यार्थी म्हणत आहेत की आम्ही, ऑफलाइन परीक्षा देणार नाही.
त्यांच्या समर्थनात आता मुंबईतील हिंदुस्थानी भाई आला आहे. हिंदूस्थानी भाईने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरुन विद्यार्थी मित्रांना आवाहन केले. मुंबई-पुणे यासह संपूर्ण राज्यभर विद्यार्थी परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यामागणीसाठी रस्त्यावर उतरले. त्यामुळे मोठा तनाव निर्माण झाला.
अनेक ठिकाणी पोलिसांना जमा झालेल्या जमावर लाठी चार्ज देखील करावा लागला. या प्रकरणानंतर हिंदुस्थानी भाई पुन्हा चर्चेत आला. आता अनेकांना हा प्रश्न पडला की हा हिंदुस्थानी भाई कोण आहे? तो इतका प्रसिद्ध कसं काय? आणि तो वर्षाला किती पैसे कमावतो. सर्वात आधी तो जरी हिंदुस्थानी भाई म्हणून जरी प्रसिद्ध असला तरी त्यांचे मूळ नाव विकास पाठक हे आहे.
तो स्वताला हिंदुस्थानी भाई म्हणवून घेतो. तो एक यूट्यूब स्टार आहे. हिंदुस्थानी भाईचा जन्म अतिशय सर्वसामान्य घरात झाला. घरातील स्थिती अतिशय हालखीची होती, म्हणून हिंदुस्थानी भाईने काही दिवस वेटरची देखील नोकरी केली. तेव्हा तो अवघ्या 7 वीमध्ये होता. फेसबुकसह तो अनेक माध्यमांवर अकटीव्ह असतो. भारत वा भारतीय संस्कृतीच्या विरोधात जे लोक आहेत त्यांच्या विरोधात तो आवाज उठवत असतो.
त्यांच्या सोशल मिडियावर तो नेहमी शिव्या देणार आणि विरोध करणारे विडियो टाकत असतो. आता पर्यत त्यांनी अनेकदा असेच शिव्या देणारे आणि टीका करणारे विडियो बनविले आहेत. त्यामुळे त्यांची हिंमत वाढत आहे. अंगावर सोने घालून संजय दत्त प्रमाणे बोलणे असे प्रकार सुरू असतात.
बिग बॉसच्या तेराव्या सीझनमध्ये देखील हिंदुस्तानी भाई सहभागी झाले होते. पाकिस्तानी, दहशदवादी यांच्या विरोधात शिर्वाळ भाषेत बोलून तो प्रसिद्ध झाला आहे. रुको जरा, सबर करो हा डायलॉग बोलून तो सोशल मिडियावर प्रसिद्ध झाला आहे.
युट्यूबवर प्रसिद्ध होण्याअगोदर हिंदुस्थानी भाई हा एक पत्रकार होता. त्याला 2011 चा क्राइम रिपोर्टिंगचा पुरस्कार देखील मिळाला आहे. हिंदुस्तानी भाऊच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती देखील चांगली नव्हती. तेव्हा त्याने वेटरचे देखील काम केले होते. तेव्हा तो अवघ्या सातवीत होता. आता त्यांचे यूट्यूबवर 5.40 लाख सबस्कायबर्स आहेत. त्याला वर्षा काठी 40 ते 50 लाख मिळतात.