गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्यावर दुखांचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा आविष्कार यांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यु झाला आहे. आविष्कारच्या मृत्युबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केला होता. आविष्कार हा मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता. तो सांगवी येथील मेघे मेडिकल कॉलेज येथील विद्यार्थी होता.
24 जानेवारी रोजी आविष्कार आणि त्यांचे मित्र वाढदिवस साजरा करून हॉटेलला परतत होते. तेव्हाच त्यांच्या झायलो गाडीला अपघात झाला. झायलो गाडी पुलाच्या भिंती तोडून कार नदीत कोसळली. या अपघात आविष्कार सह त्यांचे सहा मित्र देखील जागीच ठार झाले. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएस करत होते. हे सर्व विद्यार्थी यवतमाळ येथे पार्टी करून वर्ध्याकडे परतत होते. रहांगडाले यांना हा मोठा धक्का आहे. त्यांच्या सांत्वनासाठी अनेक लोकप्रतिनिधी आणि सामान्य लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी येत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील रहांगडाले कुटुंबाचे सांत्वन केले.नितीन गडकरी सहपत्नी आले होते. गडकरी आणि रहांगडाले कुटुंबियांचे घरोब्याचे संबंध आहेत.गडकरी रहांगडाले यांना भेटायला आले त्यांना पाहताच रहांगडाले यांना अश्रु अनावर झालेत. गडकरी यांना रहांगडाले यांनी अपघातासंदर्भात सर्व माहिती दिली. विजय रहांगडाले यांची भेट घेतल्यानंतर खूप मोठे संकट आहे असं म्हणत गडकरी यांनी रहांगडाले यांच्या पत्नीचे सांत्वन केले.
खरंच हा फार मोठा धक्का आहे.रहांगडाले कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर गडकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. हा अपघात कसा झाला त्यासाठी चौकशी करण्यासाठी समिती तयार केली आहे. तांत्रिक कारण तसेच रोड इंजिनीर यांचे कार तर नाही यांची देखील चौकशी करण्यात येणार आगे. कार सदोष असल्यामुळे तर हा अपघात झाला नाहीना यांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. रसस्ते सुरक्षितेबद्दल आपण जागरूक असायला हवे.
देशभरात वर्षभरात पाच लाख अपघात होतात. यामध्ये साडे तीन लाख लोक मृत्यु पावतात. तामीळनाडू सरकारने त्यांच्या राज्यातील 50 टक्के अपघात नियंत्रणात आणले आहेत. महाराष्ट्रात आपण अपघात कसे टाळू शकतो याबाबत उपाययोजना करणार आहोत. ते गरजेचे आहे. वर्धा येथे झालेला अपघात ही घटना खूप दुर्दैवी आहे. रहांगडाले कुटुंबासोंबत माझे घरगुती संबंध आहेत.
म्हणून मी आज त्यांच्या परिवाराला आज भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे. त्यांच्या मुलांच्या आत्म्याला शांती लाभो, देव त्यांना दुख सहन करण्याची ताकद देवी ही प्रार्थना.