Home » कागद आणि पेनच्या जोरावर पहिल्याचं मोसमात गुजरातने आयपीएलचं विजेतेपद खेचून आणले
Articles खेळ-कुद

कागद आणि पेनच्या जोरावर पहिल्याचं मोसमात गुजरातने आयपीएलचं विजेतेपद खेचून आणले


आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियम लिग, भारतीयाचं क्रिकेट प्रेम लक्षात घेऊन सुरू केलेला क्रिकेटचा नवीन प्रकार. आयपीएलचा प्रत्येक मोसम लक्षात राहतो. यंदाचा मोसम खास ठरला तो गुजरातच्या संघांमुळे. गुजरातचा संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला आणि आयपीएलची ट्रॉफी जिंकून घेऊन गेला.

गुजरातच्या आयपीएलच्या यशामागे टीमचा प्रशिक्षक आशीष नेहरा यांचा मोठा वाटा आहे.गुजरातचा संघ जिंकला आणि सोशल मिडियावर एक फोटो तूफान व्हायरलं झाला. तो फोटो होता आशिष नेहरा यांचा उलटी टोपी, हातात कागद आणि पेन असलेला. या फोटोवरुन अनेक मीम्स कालपासून व्हायरलं होत आहेत. कुछ तो खास बात थी, तो फक्त कागद आणि पेनने सामना जिंकत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये आशिष नेहरा रशीद खान सोबत चर्चा करताना दिसत आहे.

कालचा सामाना पाहण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. त्यांचे फोटो देखील मीम्ससाठी व्हायरलं होत आहेत. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुभम गिल यांनी जोरदार कामगिरी करत गुजरातला आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवून दिली आहे.

आशिष नेहराने खेळांडूना मैदानावर जोरदार मार्गदर्शन केले. त्याने त्यांचे अनुभव सांगत खेळांडूना कशाप्रकारे खेळलेले पाहिजे हे देखील सांगितले.हार्दिक पांड्या म्हणतो मी आणि आशिष नेहरा यांनी एक गोष्ट पाहिली आहे आणि एक मत काढलं आहे,ती गोष्ट म्हणजे फलंदाज आहेत तर खेळ आहे पण गोलंदाज तुम्हाला खेळ जिंकून देऊ शकतात. कोणी काहीही म्हणो पण गुजरातने त्यांच्या घरच्या मैदानांवर पाहिल्याचं मोसमात आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.एक नवीन इतिहास रचला आहे.