महाराष्ट्रातील तरुणवर्गांमध्ये मागील पाच वर्षांपासून अनेकांना एका ध्येयाने वेडे केले आहे. या ध्येयापायी अनेकांनी आपल्या चांगल्या पगारांच्या नोकऱ्या सोडल्या, हे ध्येय आहे तर म्हणजे सरकारी सेवेत नोकरी करण्याचे. अधिकारी बनण्याचे स्वप्न, पोरं mpsc यूपीएससी च्या नादापायी पुण्याकडे धाव घेतात, एका खोलीत अक्षरक्षा सहा -सातजण राहतात,लायब्ररी लावतात दिवस-दिवस अभ्यास करतात, पोटाला चिमटा काढतात पण एक तरी पोस्ट काढतात आणि असेच तरुण अनेकांसाठी आदर्श बनतात.
नांदेड जिल्ह्यातील माधव गित्तेची अशीच काही यशोगाथा आहे. माधव यांच्या घरातील आर्थिक स्थिती अतिशय बिकट होती. आई-वडील आणि माधव यांच्यासह त्यांची इतर भावंडे सर्व मिळून शेती करत. यावर त्यांच्या घराचा कसा तरी प्रपंच चालू होता. माधव दहावी असताना त्यांच्या आईला कॅन्सरचे निदान झाले.
आईच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला. माधव अकरावीत असताना त्यांच्या आईचे निधन झाले, घराचा मोठा आधारच गेला, त्यामुळे घराची सर्व जबाबदारी माधववर आली, तो अभ्यासात हुशार असून देखील त्याला त्यांचे शिक्षण थांबवावे लागले. माधवने त्यांच्या शिक्षणांची आस सोडली नाही, त्याने 12 वीला प्रवेश घेतला.
तब्बल 22 किलोमीटर अंतर पार करावे लागत. माधवने बारावीत 56 टक्के मिळाले. त्यानंतर माधवने असा कोर्स करण्याचे ज्यातून त्याला लवकरात लवकर नोकरी मिळेल. जवळच्या गावातच एक डिप्लोमा कोर्स सुरू झाला होता त्या कोर्सला माफक फी होती .
माधवने त्या डिप्लोमा कोर्सला अॅडमिशन घेतले, डिप्लोमापूर्ण केला, पुण्यात डिग्रीला अॅडमिशन घ्यायचे होते पण फी भरण्यासाठी मात्र पैसे नव्हते, माधव यांच्या वडिलांनी त्यांची शेती आणि घर गहाण ठेवले आणि माधवची डिग्रीपूर्ण केली. डिग्रीपूर्ण केल्यानंतर माधवला उत्तम जॉब मिळाला.
त्याने त्यांच्या जॉबच्या जोरावर कर्ज फेडले, घर सोडविले,जमीन सोडविली, एक दिवस माधव एक आयएएस अधिकाऱ्याची मुलाखत पाहिली आणि त्याने देखील यूपीएससी करण्याचे ठरविले. पण नोकरी सोडून पूर्णवेळ अभ्यास करणे शक्य नव्हते. शेवटी थोडी पैशांची जुळवा-जुळव केली , मित्रांनी देखील मदत केली आणि माधवने यूपीएससीसाठी दिल्लीला जाण्याचे ठरविले. दिल्लीला गेला आणि तिथे अभ्यास केला.
2017, 2018 दोनदा परीक्षा दिली मात्र यश काही मिळाले नाही. अखेर 2019 परीक्षा दिली आणि त्यामध्ये माधवला उत्तम यश मिळाले. यूपीएससीमध्ये त्याला 210 क्रमांक मिळाला. माधव आयएएस अधिकारी बनला. 2017 -2019 काळात त्याने अनेक सरकारी परीक्षा दिल्या त्याला त्यामध्ये यश देखील मिळाले पण त्याला मात्र आयएएस व्हायचे होते.माधव म्हणतो किती जरी अपयश आले तरी खचून जाऊ नका तुमचे प्रयत्न करत रहा यश नक्कीच मिळेल.