Home » सलमानसारखे 100 लोक मी दारावर उभे करीन, त्यांना गल्ली झाडायला लावीन – अभिजीत बिचुकले
Articles आपलं राजकारण

सलमानसारखे 100 लोक मी दारावर उभे करीन, त्यांना गल्ली झाडायला लावीन – अभिजीत बिचुकले

आक्रमक वागणे आणि वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखला जाणार अभिजीत बिचकुले बिग बॉस 15 मधून बाहेर पडला आहे. अभिजीतचा बिग बॉसमधील हा प्रवास वादग्रस्त ठरला आहे. बिचुकुले खूप वादग्रस्त विधाने करतो, त्यामुळे सलमान खानने त्यांची जोरदार कानउघडणी केली. बिचुकुलेला काढून टाकण्यात आले.

त्यामुळे बिचुकुले बाहेर आल्यानंतर त्याने सलमान खानवर जोरदार टीका केली आहे.सलमान खानला त्यांच्यापेक्षा दुसरे कोणी मोठे झालेलं सहन होत नाही. त्यांच्या सारखे 100 जण मी दाराशी उभे करीन आणि माझी गल्ली झाडायला लावीन अशी वक्तव्य करत बिचुकुले ने नवीन वाद निर्माण केला आहे.

दरम्यान बिग बॉस 15 च्या नुकत्यास प्रसारित करण्यात आलेल्या भागातुन अभिजीत बिचुकुले आणि देवोलिना भट्टाचार्य हे दोघे घराबाहेर पडले आहेत. मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या अभिजितने वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉस 15 च्या घरात प्रवेश केला. मराठी बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या अभिजीतने वाइल्ड कार्डद्वारे बिग बॉस 15 च्या घरात प्रवेश केला.घरांमध्ये असताना देखील बिचुकले वागणं आक्रमक होतं.

राखी सावंतसह अनेक स्पर्धकांशी त्याने कायम पंगा घेतला होता. त्यांच्या वागण्यामुळे विकेंड का वार मध्ये सलमानने त्यांची अनेकदा कानउघणीही केली होती. त्यावेळी सलमान म्हणाला होता की तू ज्या घाणेरड्या भाषेत बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी बोलतोस तसेच तू तुझ्या घरच्यांशी बोलशील का? पुन्हा जर अशी भाषा मी ऐकली तर तुझे केस ओढून मी स्वतः घराबाहेर खेचत आणून तुला मारेन.