प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं, असं कवि मंगेश पाडगांवकर म्हणतात. पण प्रेम हे जाती धर्म आणि त्या पलीकडे असतं. आपल्या देशांत अजून देखील प्रेम विवाहाला तीव्र विरोध होतो. पण काही प्रमाणात अनेक पालक मुलांचे सुख पाहून प्रेम विवाह करण्यास समंती देतात. पण जर मुलगी मुस्लिम आणि मुलगा हिंदू असेल तर मात्र या विवाहाला परवानगी मिळणे शक्यच नसते.
पुण्यात असाच एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून एका मुस्लिम मुलीने हिंदू मुलांशी लग्न गाठ बांधली आहे. पुण्यातील आंबेगाव येथे हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावच्या अल्फीया जमादार हिने अक्षय राऊत यांच्याशी विवाहगाठ बांधली आहे. अल्फीया हिचे नाव आता अपेक्षा ठेवण्यात आले आहे.
अपेक्षा म्हणते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिलेले आहे. ते म्हणतात सर्व मनुष्य एकच आहे. मी स्वता जुन्नर तालुक्यातील आहे, शिवाजी महाराजाचा इतिहास वाचत ही लहानाची मोठी झाली आहे. मला आधीपासूनच हिंदू संस्कृती विषयी आकर्षण होते. माझ्यासाठी जाती -धर्म महत्वाचा नाही तर माणुस महत्वाचा आहे. मला नेहमी वाटायचे माझा जोडीदार मला समजून घेणारा असावा, त्याने सात जन्म माझी साथ द्यावी.
आफियासाठी हा निर्णय घेणे सोप्पे नव्हते. तीच्या वडिलांनी आणि त्यांच्या काही नातेवाइकांनी आफियाला तेथे येऊन मारहाण केली. आफियाने पोलिस प्रोटेक्शनची मागणी केली आहे. आफिया म्हणते मी सज्ञान आहे, मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हे लग्न मी माझ्या मार्जिने केले आहे.