Home » 10 रुपये तरी खिशात आहेत का? suv खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा सेल्समनकडून अपमान मग झालं असं
Articles झाल कि व्हायरल!

10 रुपये तरी खिशात आहेत का? suv खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा सेल्समनकडून अपमान मग झालं असं


एखाद्या व्यक्तीची किंमत त्यांच्या कपड्यांवरून करू नका असं म्हणतात. कपड्यांवरून माणसाची पारख न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कर्नाटकमधल्या एका सेल्समननं ही चूक केली. तूमकुरमध्ये वास्तव्यास असलेला शेतकरी त्यांच्या मित्रासोबत एका कारच्या शोरूममध्ये गेला होता.

कारच्या शो रूममध्ये गेल्याबरोबर तिथल्या सेल्समनने केंम्पेगौडा यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. केंम्पेगौडा अतिशय साध्या कपड्यात होते. त्यांनी त्या सेल्समनला नवीन आलेली एक suv कार दाखविण्याविषयी सांगितले. केंम्पेगौडा यांच्या कपड्याक डे पाहत त्या सेल्समनने त्यांचा अपमान केला आणि त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. केंम्पेगौडा हे सुपारीची शेती करतात. ते चिक्कासांद्रा होबलीमध्ये राहतात.

केंम्पेगौडा त्यांच्या मित्रासह महिंद्रा कारच्या शोरूममध्ये गेले तेथे त्यांना बोलेरो ही गाडी आवडली. त्यांनी त्या गाडीची माहिती घेतली आणि डाऊन पेमेंट करून लगेच गाडी घेण्याची तयारी दाखविली. केंम्पेगौडा त्या सेल्समनला म्हणाले मी 2 लाख रुपये डाऊन पेमेंट भरतो मला आजच गाडी द्या, त्यावर सेल्स टीमने त्यांना सांगितले हे शक्य नाही. त्यावर केंम्पेगौडा म्हणाले मी दहा लाख रुपये लगेच भरतो पण मला आजच गाडीची डिलिव्हरी द्या, त्यावर सेल्स टीमने त्यांची चेष्टा करण्यास सुरुवात केली.

10 लाख दूर राहिले. तुमच्या खिशात 10 रुपये सुद्धा नाहीत.असं म्हणत केंम्पेगौडा यांची सेल्समनने चेष्टा केली. अर्ध्या तासात 10 लाख रोख द्या आणि आजच गाडी घेऊन जा. असं सेल्समन त्यांना म्हणाला. केंम्पेगौडा यांनी लगेच त्यांच्या मित्राला फोन लावला आणि अवघ्या 30 मिनिटांत 10 लाख जमा केले.

पण त्या नंतर मात्र सेल्स टीमने गाडी देण्यासाठी किमान 3 दिवस लागतील असं सांगितलं. कारण शनिवार आणि रविवार लगेच जोडून आला होता. त्यामुळे कार लगेच देणे शक्य नव्हते. केंम्पेगौडा आणि त्यांचे मित्र नाराज झाले. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली,सर्व शेतकऱ्यांनी मिळून त्या शोरूमला घेराव घातला.

पोलिसांनी कशीबशी समजूत काढली.केंम्पेगौडा यांनी पोलिसांना सांगितले, या सेल्समनने माझा अपमान केला आहे, जर त्याने लेखी माफी मागितली तरच ठीक आहे. आता मला कार नको, लिखित माफी द्या, अन्यथा शोरूम बाहेर आंदोलन करू. त्या नंतर त्या सेल्समनने केंम्पेगौडा याची माफी मागितली आणि अशा प्रकारे हे प्रकरण निवळले.