शहरांमध्ये ट्रॅफिक जॅममध्ये अडकणे भारतात ही काही नवीन गोष्ट नाही. ट्रॅफिक मधला गोंधळ आणि सततचे हॉर्न ही नेहमीची गोष्ट आहे. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बाहेर जातो तेव्हा ट्रॅफिक असणार असे पकडतो. ट्रॅफिकचे नियम पाळणारे तर भारतात अगदी मोजकेच लोक भेटतील.
सिग्नल तोडणे, वन वे न पाळणे असे अनेक लोक आपल्याला भेटतात. अनेकदा वन वे संपताच पोलिस थांबलेले असतात लोक मात्र उलटे येत असतात. अनेकदा अशामुळे अपघात होतात. पण आपल्या भारतात असे एक राज्य आहे, जेथे नागरिक स्वता शिस्त पाळतात. मिझोराम मधील असाच एक फोटो व्हायरलं होत आहे, या फोटोची दखल चक्क प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली आहे.
What a terrific pic; Not even one vehicle straying over the road marker. Inspirational, with a strong message: it’s up to US to improve the quality of our lives. Play by the rules… A big shoutout to Mizoram. ?????? https://t.co/kVu4AbEYq8
— anand mahindra (@anandmahindra) March 1, 2022
आनंद महिंद्रा म्हणतात की मिझोरामच्या लोकांकडून शिका. उद्योगपती आनंद महिंद्रा यांना मिझोराम वाहतूक कोंडीचा फोटो शेअर केला आहे. ते म्हणतात किती अप्रतिम चित्र आहे. एकही वाहन रोड मार्करच्या बाहेर नाही. हे किती प्रेरणादायी आहे. यातून देशाला किती मजबूत संदेश देत आहे. आता आपण आपल्या जीवनाचा दर्जा कसा सुधारायचा ते आपल्यावर अवलंबून आहे. नियम पाळा.
मिझोरामचे लोक खरोखरच कौतूकासपात्र आहेत. फोटोत तुम्ही पाहू शकता. वाहतूक कोंडी झालेली असताना देखील लोक शांतपणे त्यांच्या रांगेत उभा आहेत. ट्रॅफिक मोकळे होण्याची वाट पाहत आहेत. अर्धा रस्ता रिकामा असताना देखील कोणीही नियम मोडत नाही.