Home » भारत माता की म्हणताच जय घोष पण मोदीचे नाव घेताच..
Articles आपलं राजकारण

भारत माता की म्हणताच जय घोष पण मोदीचे नाव घेताच..


रशिया आणि यूक्रेन यांच्यात सुरू झालेल्या युद्धांमुळे हजारो भारतीय यूक्रेनमध्ये अडकून पडलेले आहेत. त्यांना परत आणयासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केले आहे. या अंतर्गत आता पर्यत हजारो भारतीयांना परत आणले जात आहे. त्यासाठी यूक्रेनशेजारील राष्ट्रामध्ये भारताचे 4 केंद्रीयमंत्री पोहचले आहेत. ते भारतीयांना धीर देत आहेत. तर वायुसेनेच्या मदतीने देशवापसी देखील सुरू आहे.

या दरम्यान अनेक विडियो व्हायरलं होत आहेत. असाच एक विडियो सध्या व्हायरलं होत आहे. या विडियोमध्ये काही विद्यार्थी विमानाने परत येत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा तर जाणवत आहेच पण मायदेशांत परतणार असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

विमानात बसताच काहीनी घोषणा देण्यास सुरुवात केली. भारत माता की जय. सर्व थकलेले होते तरी देखील सर्वांच्या मुखातून एकाच जोशात आवाज आला, भारत माता की जय, त्या नंतर काहीनी आवाज दिला मोदीजी जिंदाबाद मोदीजी जिंदाबाद ते विद्यार्थी मात्र काहीच बोलले नाही.

त्या वेळी मात्र अनेकांचा आवाज बारीक झाला. हा विडियो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरलं होत आहे. यावर एका आयएएस अधिकाऱ्याने जोरदार टिप्पणी केली आहे, ते म्हणतात भारत माता की जय घोषणा देताच मुलांचा उत्साह पाहण्यासारखा आहे पण तेच मोदीजी बाबत घोषणा देताना दिसत नाही.


केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत 80 उड्डाणे तैनात केली आहेत. या मिशनवर देखरेख ठेवण्यासाठी दोन डझनहून अधिक मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.यूक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आण्यासाठी मिशन गंगा जोरदार सुरू आहे. यासाठी फ्लाइटच्या फेऱ्यादेखील वाढविण्यात आल्या आहेत. एकूण 80 उड्डाणे ठरविण्यात आली आहेत. 20 हजारांहून अधिक भारतीय यूक्रेनमध्ये अडकले आहेत. एयर इंडिया, स्पाइस जेट, विस्तारा, गो एअर आणि एअर फोर्स यांच्या एकूण 80 फेऱ्या होणार आहेत.