Home » लब्यू भावा म्हणत किरण मानेंनी केले नागराजचे तोंड भरून कौतूक
Articles Entertainment

लब्यू भावा म्हणत किरण मानेंनी केले नागराजचे तोंड भरून कौतूक


झुंड या चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. झुंड सिनेमाचे प्रत्येक स्तरातून तितकेच कौतूक होत आहे. अभिनेता आमीर खान ते दक्षिणेतील सुपरस्टार धनुष्य यांनी देखील झुंडचे जोरदार कौतूक केले आहे. आमीर खान देखील म्हणाला आहे, आम्हाला जे 20-25 वर्षात जे जमलं नाही ते नागराजने एका चित्रपटांमध्ये करून दाखवलं आहे.

धनुष देखील म्हणाला की माझी आणि नागराजची जोडी देखील एक वेगळं कॉम्बिनेशन होऊ शकते. अभिनेता किरण माने याने देखील नागराजचे तोंडभरून कौतूक केले आहे. किरण माने मुलगी झाली हो मालिकेत काम करत होते. किरण माने यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट बरेच अकटीव्ह असता. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. किरण माने यांनी पोस्ट करत झुंड या चित्रपटांचे अगदी तोंड भरून कौतूक केले आहे.

अभिनेता किरण माने यांनी नागराज मंजुळे यांचे कौतूक केले आहे. तसेच नागराज यांची एक कविता शेअर केली आहे. किरण माने म्हणतात नागराज लै लै वर्ष झाली ही खाली पोस्ट केलेली तुझी कविता. तुझ्या येण्याअगोदर एक पत्र ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेच महाकाव्य करून तू मोठ्या पडद्यावर मांडलं आहे आणि संपूर्ण देश तू हालवून सोडला आहेस.

भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शनाच्या स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप बदलतोस, सगळी बंधन झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस, सहजपणे बघायच आणि समजून घ्या असा आग्रह न करता या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू प्रेरणा ठरणा आहेस, लब्यू भावा म्हणत किरण मानेंनी केले नागराजचे तोंड भरून कौतूक केले आहे.