इंस्टाग्रामवर कधी कोण व्हायरलं होईल हे सांगता येत नाही. इंस्टाग्राम हे असं माध्यम आहे ज्यावर तुम्ही एक रील्स बनवून देखील प्रसिद्ध होऊ शकतात. पण अनेकांना हे माहीत देखील नसेल की इंस्टाग्रामवरुन देखील उत्तम पैसे कमावता येतात. मागील दोन दिवसांपासून थेरगावची एक 18 वर्षांची मुलगी इंस्टाग्राम रील्समुळे बरीच प्रसिद्ध झाली आहे.
तीच्या रील्समुळे तिला पोलिसांनी देखील अटक केले होते पण असे देखील अनेक इंस्टाग्राम स्टार आहेत, जे चांगले रील्स बनवून उत्तम पैसे कमावत आहेत. आता तुम्ही विचार कराल इंस्टाग्रामवरुन कसे पैसे कमावायचे तर आजच्या या लेखात आपण हे जाणून घेणार आहोत. इंस्टाग्रामच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे.
सर्वात आधी तुम्हाला ही गोष्ट माहीत असावी की इंस्टाग्राम युट्यूब प्रमाणे तुम्हाला जाहिरातीचे पैसे देत नाहीत, मग तुम्ही विचार कराल पैसे मिळतात तरी कसे. इंस्टाग्राम तुमचे फॉलोवर्स किती आहेत यावर सर्व काही ठरतं. जर तुमचे फॉलोवर्स अधिक असतील तर अनेक ब्रॅंड तुमच्याकडे येतात ते तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट वापरायला सांगतात किंवा त्यांचे फोटो तुमच्या अकाऊंटवर टाकायला सांगतात. तुम्ही जेव्हा त्यांचे प्रॉडक्ट पोस्ट करता तेव्हा ती कंपनी तुम्हाला त्यांचे पैसे देते.
म्हणजेच काय तर तुमच्या एका पोस्टसाठी तुम्हाला शेकडो ते लाखों रुपये मिळू शकतात. जसा ब्रॅंड असेल तसे तुम्हाला पैसे मिळतात. इंस्टाग्राम तुमचे फॉलोवर्स उत्तम असावेत यासाठी तुम्हाला एखादा विषय निवडणे गरजेचे आहे. जसे की फिटनेस, फूड, डान्स किंवा अन्य काही. यातील एखादा विषय निवडून तुम्ही सतत त्या विषयाचे पोस्ट करून तुम्हाला त्या विषयात रस असणारे फॉलोवर्स मिळतात. जसे तुमचे फॉलोवर्स असतात तसे ब्रॅंड तुम्हाला जाहिरात करण्यासाठी अपरोच करतात. अनेक मोठे ब्रॅंड तुम्हाला त्यांचे प्रॉडक्ट तर देतातच पण त्या बरोबरच तुम्हाला काही पैसे देखील देतात.
तुमचे फॉलोवर्स टिकवणून ठेवणे हे फार मोठे टार्गेट तुमच्या समोर असते. तुम्ही त्या ब्रॅंडची पोस्ट केल्यानंतर तुमचे फॉलोवर्स त्यावर काही कमेन्ट करतात का, पासून ते ते प्रॉडक्ट खरेदी करतात का हे सर्व फार महत्वाचे असते. अनेकदा ते तुमचे विडियो किंवा पोस्ट पाहून ते प्रॉडक्ट ऑर्डर देखील करतात. तुम्ही ज्या ब्रॅंडची जाहिरात केले आहे, त्यांना जर उत्तम प्रतिसाद मिळाला तर तुम्हाला ते ब्रॅंड आणखी पैसे देऊन आणखी पोस्ट करण्यास सांगते.
तुमचे इंस्टाग्राम फॉलोवर्स भरपूर असावेत तसेच ते अॅक्टीव्ह देखील असावे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक तरुण पिढी आहे , त्यामुळे अनेक मोठे मोठे ब्रॅंड सध्या इंस्टाग्राम फोकस करत आहेत. इंस्टाग्रामवर तुम्ही तुमचे पेज बनवून तुमचा व्यवसाय देखील करू शकता. तुमच्या व्यवसायाच्या पोस्ट टाकून तुम्ही नवीन ग्राहक जोडू शकता.
पण हे सर्व करत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जसे की तुम्ही जेव्हा इंस्टाग्राम पोस्ट करता तेव्हा जर तुमच्या पोस्टवर कोणी काही कमेन्ट केली तर त्याला देखील उत्तर द्यायला हवे तसेच तुमच्या ब्रॅंडला तुम्हाला उत्तम रीतीने मांडता यायला हवे. अशा प्रकारे तुम्ही इंस्टाग्राम वापरुन उत्तम पैसे कमावू शकता. पण यासाठी सातत्य फार गरजेचे आहे.