Home » नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार हे आहे कारण….
Articles आपलं राजकारण खास किस्से

नितीन गडकरी यांनी मानले अनिल देशमुखांचे आभार हे आहे कारण….


राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख तुरुंगात आहेत.त्यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचा आरोप आहे.या वसूली प्रकरणात भाजपा नेत्यानी देशमुखांना चांगलंच टार्गेट केलं. मात्र भाजपा नेते आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनिल देशमुख यांचे आभार मानले आहे.

काटोल नगर परिषदेच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. नागपूर ते काटोलच्या रस्त्यांचे चौपदरीकरण सुरू होते, वन विभाग कामांत अडथळा निर्माण करीत होता. तेव्हा अनिल देशमुख साहेबांनी मदत केली. म्हणून फॉरेस्ट विभागाकडून परवानगी मिळाली. त्यांचे यासाठी मी आभार मानतो. नाहीतर क्लिअरन्स मिळत नव्हता.

येणाऱ्या काळात अडचणी दूर करून रस्ता पूर्ण होईल, असं सांगतात. नागपूरमध्ये हा रस्ता चारपदरी करून दोन ठिकाणी उड्डाणपूल करणार आहोत.असे देखील गडकरी म्हणाले.