मागील वर्षी 2021 मध्ये सोशल मिडियाचे अनेक फायदे आणि तोटे समोर आले. सोशल मिडियामुळे काहीजण प्रचंड प्रसिद्ध झाले तर काही मोठ्या प्रमाणात सोशल मिडियांच्या टीकेचे शिकार झाले. बॉलीवुडचा बादशाह किंग खान आणि त्यांचा कुटुंबाला देखील सोशल मिडियाचा प्रचंड त्रास झाला.
किंग खानचा मोठा मुलगा अवघ्या 22 वर्षांचा तरुण आर्यन खानला तर प्रचंड त्रास झाला. मुंबईतील एका क्रुज पार्टीमध्ये आर्यन सापडला आणि कथित ड्रग्ज प्रकरणात आर्यनचे नाव आले. हे प्रकरण प्रचंड गाजले. आर्यनवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. तब्बल एक महिना आर्यन तुरुंगात होता. वर्ष संपता संपता हे प्रकरण देखील संपलं. सोशल माध्यमांवर आर्यनची होत असलेली टीका देखील थांबली.
सर्व सुरळीत झाले असे वाटत असतानाच एक आर्यन खानचा व्हीडीओ समोर आला आणि पुन्हा सोशल मिडियावर आर्यनवर निशाण साधला गेला.
सर्वात प्रथम हा व्हीडिओ काय आहे ते जाणून घेऊया- या व्हिडिओ मध्ये आर्यन खान अमेरिकेतील एयर पोर्टवर नशेच्या अवस्थेत सर्व लोकांन समोर मूत्र विसर्जन करत आहे. हा व्हीडिओ अचानक व्हायरलं झाला आणि पुन्हा आर्यन खानवर टीका सुरू झाली.
काय आहे या व्हीडीओ मागील सत्य – सर्वात प्रथम हा व्हीडीओ फार जुना आहे. हा व्हीडीओ 2012 मधील लॉस एंजिलस एयरपोर्टवरील आहे. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या व्हीडीओ मधील मुलगा हा आर्यन खान नसून हा अमेरिकेतील एक कलाकर ब्रॉनसन पेलेटियर आहे. 2012 साली लॉस एंजिलस एयरपोर्टवर ब्रॉनसन पेलेटियरने नशेमध्ये एयर पोर्टवर मूत्रविसर्जन केले होते. पण आपल्या येथे भारतात अचानक हा व्हीडीओ आर्यन खानचे नाव पुढे करून व्हायरलं करण्यात आला. पण हा व्हीडिओ संपूर्ण चुकीचा आहे.यामधील हा युवक आर्यन खान नसून एक अमेरिकन अभिनेता आहे. पण बिचाऱ्या आर्यन खानला टीकेचे धनी व्हावे लागले.