आपण अनेकदा रिक्षाने प्रवास करतो. रिक्षाने जाताना अनेकदा आपले सामान रिक्षामध्ये विसरते. पण अनेकदा ते सापडतच नाही. पण काही प्रामाणिक रिक्षावाले असतात जे तुम्हाला ते परत करतात. आज अशीच एक घटना मीरा रोड येथे घडली. मीरा रोड येथून राहुल लुणावत ते त्यांची पत्नी आणि मुलीसह कांदिवली ते भाईदर असा रिक्षातून प्रवास करत होते.
रिक्षाच्या मागील भागात 5 लाखांचे हीरे आणि महत्वाची कागदपत्रे मात्र रिक्षातच विसरले. रिक्षातून उतरल्यानंतर लुणावत यांच्या लक्षात आले. पण रिक्षा मात्र निघून गेली होती. लुणावत यांनी तातडीने भाईदर पोलिस ठाण्यात धाव घेतली. रिक्षात हीरे व कागदपत्रे असलेली बॅगघाईघाईने रिक्षात विसरलेले पोलिसांना सांगितले.

पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांनी तातडीने दखल घेतली. उपनिरीक्षक मुगुट पाटील यांनी विषयाचे गांभीर्य पाहिले लुणावत ज्या ठिकाणी उतरले होते, तेथील सीसीटीव्ही फुटेज त्यांनी पाहिले. 5 ते 6 ठिकाणचे फुटेज पाहिल्यानंतर त्यांना रिक्षा क्रमांक सापडला. त्यांनी त्या नंबरच्या मदतीने रिक्षा चालकांचा शोध घेतला. पोलिसांनी रिक्षा गाठली. रिक्षाच्या सीटच्या मागच्या भागावर हीरे व कागद पत्राची बॅग तशीच होती.
रिक्षा चालकांच्या देखील ते लक्षात आले नाही. भाईदर पोलिसानी अवघ्या 10 तासात हीरे शोधून स्वाधीन केले. तब्बल पाच लाखांचे हीरे हरविल्यामुळे लुणावत परिवार चिंतेत होता. हीरे मिळताच सर्वांनी पोलिसांचे आभार मानले