Home » तुमच्याच घरचं जेवण मुंबईत कुठेही पोचवणारी ‘डब्बेवाल्यां’ची आयडीया अशी सुचली
Articles खास तुमच्यासाठी!

तुमच्याच घरचं जेवण मुंबईत कुठेही पोचवणारी ‘डब्बेवाल्यां’ची आयडीया अशी सुचली


मुंबई आणि डब्बेवाले मागील शंभर वर्षांहून एक अचूक समीकरण आहे. सध्या अनेक अॅपच्या माध्यमातून आपण वस्तु एक ठिकाणावरून दुसरीकडे पाठवितो ते पाठविण्यासाठी आपण बरेच पैसे देखील मोजतो, जीपीएसमुळे आपल्याला तो व्यक्ती किती वेळात येईल हे देखील समजते पण, मुंबईतील डब्बेवाले (mumbai dabbawala) मात्र 1890 पासून कोणतेही जीपीएस नसताना, कोणत्याही कागदाचा वापर न करता योग्य वेळी, योग्य ठिकाणी डब्बा पोहचवितात. ते ही अगदी किफायतशीर दरात. त्यांच्या या जलद आणि अचूक कामामुळे जगभरातील अनेक प्रसिद्ध मासिकांनी मुंबईच्या डब्बे वाल्यांची दखल घेतली आहे.

डब्बेवाल्यांचे काम कसे आहे, हे आपण अनेकदा वाचले आहे पण पहिला डब्बेवाला कोण होता, त्यांच्या डोक्यात कशी काय ही भन्नाट आइडिया आली. यांची भन्नाट स्टोरी आपण जाणून घेणार आहोत. मुंबईत पारशी समाज पूर्वी मोठ्या प्रमाणात होता, हा समाज उच्च शिक्षित समाज म्हणून ओळखला जातो. उच्चशिक्षित असल्यामुळे या समाजातून अनेक अधिकारी देखील होत. असेच एक पारशी अधिकारी त्यांचे कार्यालय ते त्यांचे घर बरेच दूर होते, ते रोज दुपारी जेवायला येत.

त्या काळी गाड्या देखील फार नव्हत्या, वाहनांची काही विशेष सोय नव्हती. हे अधिकारी टांगागाडी द्वारे घरी जेवायला जात. यामध्ये त्यांचा तब्बल दीड तास जात. एक दिवस एका व्यक्तीने त्या अधिकाऱ्यास सांगितले, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगतो. आपण रोज दुपारी घरी जेवायला जाता, पुन्हा येता यामध्ये तुमचा फार वेळ जातो. यापेक्षा रोज मी तुमचा डब्बा घेऊन येत जाईल. तुम्ही कार्यालयातच जेवत जा, यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल, काम देखील अधिक होईल.

त्या अधिकाऱ्याला ही कल्पना आवडली. अशा प्रकारे डब्बेवाले यांची सुरुवात झाली. महादू बच्चे यांनी 1890 साली 35 डब्बेवाले यांना घेऊन ही सेवा सुरू केली. आज तब्बल 50000 हजार डब्बेवाले आहेत. ते अडीच लाख डब्बे पोहचवितात. यातील 85 टक्के डब्बेवाले निरक्षक आहेत. तरी देखील ते अचूक डब्बे पोहचवितात. प्रत्येक डब्ब्यावर रंगांनी खाणा- खुणा केलेल्या आहेत. त्यामुळे कधीही डब्बा हरवत नाही किंवा चुकत देखील नाही. अदला -बदली देखील होत नाही.

प्रत्येक डब्बेवाला वेळेचे काटेकोर पालन करतो. प्रत्येक ठिकाणी केवळ 5 सेंकेद डब्बेवाले थांबतात. जर एखाद्या रोजच उशीर होत असेल तर तो डब्बा बंद केला जातो. डब्बेवाले यांना पोशाख देखील सक्तीचा आहे. सर्व डब्बेवाले यांनी डोक्यावर टोपी घालणे अनिवार्य आहे. डब्बेवाले हे महिन्याचे अवघे 600 रुपये घेतात. एक डब्बा पोहचविण्यासाठी ते फार मेहनत घेतात. डब्बे गोळा करणे, ते जिथे पाठवायचे आहे, ते वेगळे केले जातात. त्या नंतर ते जलद लोकलमध्ये चढविले जातात.

अनेकदा तर तुम्ही पोहचण्याअगोदर तुमचा डब्बा ऑफीसात पोहचलेला असतो. मागील दहा वर्षांपासून डब्बेवाले यांनी कधीच संप केला नाही. डब्बेवाले हे कोणाच्या हाताखाली काम करत नाहीत. त्यांचे कोणी एक मालक देखील नाहीत. डब्बेवाले याची एक ट्रस्ट देखील आहे, हे सर्व डब्बेवाले त्यांचे सभासद आहेत. डब्बेवाले सायकल, हातगाडी, रेल्वे, सायकल यांचा वापर करून डब्बे पोहच करतात. कोणतेही इंधन हे वापरत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीने नियम मोडले तर त्यास 1000 रुपये दंड केला जातो.