नाना पाटेकर बॉलीवुडमधील एक धडाकेबाज नायक. ते नायक जरी असले तरी ते खलनायका सारखे वाटतात. त्यांचे जवळपास सर्व चित्रपट हे त्यांच्या अॅक्टिंगसाठी लक्षात राहतात. त्यांचे कित्येक डायलॉग अजून देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नाना पाटेकर यांच्या अॅक्टिंगमध्ये जो एक अँगर आहे तो कोठून आला असेल असा प्रश्न सर्वांना पडतो. तर यांचे उत्तर आहे, त्यांना हा अँगर त्यांच्या मामाच्या कुटुंबांकडून मिळाला आहे.
पहिला मराठी डॉन, दाऊद देखील ज्याला घाबरायचा असा मुंबईतील कुप्रसिद्ध असा डॉन म्हणजे मन्या सुर्वे आणि नाना पाटेकर याचं अगदी जवळच नातं आहे. मन्या सुर्वे नाना पाटेकर यांचा मामेभाऊ आहे. नाना पाटेकर यांच्या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे होते. रमण सुर्वे नाना पाटेकर यांचा धाकटा मामा.
नाना अशा खराब वातावरणात वाढू नयेत म्हणून त्यांची आई, मुंबईतून मुरुड -जंजीऱ्यात राहण्यास गेले होत. मनोहर ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील एक कुप्रसिद्ध डॉन होता. त्यांच्या आयुष्यावर शूट आउट अँट वडाळा हा हिंदी सिनेमा देखील आला होता.मुंबईतील एका मध्यवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले, मात्र आपल्या सावत्र भावामुळे तो गुन्हेगारी जगतात आला.
त्याने त्यांच्या मित्रांना घेऊन गॅंग बनविली. मन्याने पाहिला खून केला तो 1969 मध्ये दांडेकर नावाच्या व्यक्तीचा केला होता. जन्मठेपेची शिक्षा देखील झाली. पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती.तेथून त्याने पळ काढला पोलिसांच्या चकमकीत तो ठार झाला.