Home » देवगिरी किल्ल्यांचा स्वच्छतेचा नवा पॅटर्न , प्लॅस्टिक बॉटल न्यायची असेल तर 20 रुपये डिपॉझिट ठेवा
Articles खास तुमच्यासाठी!

देवगिरी किल्ल्यांचा स्वच्छतेचा नवा पॅटर्न , प्लॅस्टिक बॉटल न्यायची असेल तर 20 रुपये डिपॉझिट ठेवा


महाराष्ट्रात अनेक गड-किल्ले आहेत , पण या गड किल्ल्याचे संवर्धन व्हायला हवे असे अनेकांना वाटते ,तसेच गड- किल्ल्यांवर स्वच्छता असायला हवी असे अनेकांना वाटते. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी किल्ल्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकू नयेत म्हणून गोवळकोंडा किल्ल्यांवरच पॅटर्न भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गेल्या वर्षभरापूर्वी सुरू केला.

पर्यटकांजवळ पाण्याची बॉटल असेल तर सुरक्षा ठेव म्हणून 20 रुपये घेतले जातात. किल्ला पाहून आल्यावर बाटली दाखवून ते 20 रुपये परत दिले जातात. हा उपक्रम आता यशस्वी होत आहे. यामुळे किल्यावरील कचऱ्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. या उपक्रमाचे सध्या बरेच कौतुक होत आहे. किल्यावर अनेक खदं के असतात अशा खंदका मध्ये अनेक नागरिक पाण्याच्या बाटल्या टाकतात. या खंदकातुन काढण्यास खूप अडचण होत आहे. किल्ल्यांवरील कचऱ्यामुळे पर्यटन विभागावर नेहमीच टीका होत असते. पण आता या उपक्रमामुळे कचरा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

पर्यटकांना देखील ही गोष्ट प्रचंड आवडली आहे. यापूर्वी हा पॅटर्न हैद्राबाद येथील गोवळकोंडा किल्ल्यावर देखील राबविण्यात आला होता, तेथे देखील उत्तम प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील गड- किल्ल्यांवर असा उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी आता पर्यटक करत आहेत.आता अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात गड- किल्ले यांना भेटी देत आहेत. मध्यंतरी लॉक डाऊनमुळे पर्यटकांची संख्या बरीच कमी झाली होती. मात्र आता पुन्हा पर्यटक गड- किल्ले यांच्याकडे वळाले आहेत.