Home » अभिमानास्पद…सायरस पूनावाला करतात अर्ध्या जगाला रोगप्रतिकारक लसींचा पुरवठा
Articles आरोग्य

अभिमानास्पद…सायरस पूनावाला करतात अर्ध्या जगाला रोगप्रतिकारक लसींचा पुरवठा

पुण्यात बनतात अर्ध्या जगाला लागणाऱ्या रोग प्रतिबंधक लसी-निर्माते आहेत सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला
जगभरात सातत्याने रोगाच्या साथी पसरत असतात, त्यावर उपाययोजना म्हणून विविध रोग प्रतिकार लसींचा शोध लावला जातो. या लसीमुळे रोगप्रसारावर पायबंद बसण्याबरोबरच रोग होणार नाहीत याची दक्षता घेणे शक्य होते.भारतात देवी, डांग्या खोकला अशा रोगांच उच्चाटन करण्यासाठी लसींचा उपयोग केला जातो.तुम्हाला वाचून अभिमान वाटेल की, या लसी आपल्या भारतात तयार होतात इतकच नव्हे तर त्या महाराष्ट्रातील पुणे येथे तयार होतात.भारतातबरोबरच या लसींचा पुरवठा आफ्रिका, आशिया खंडातील देशात केला जातो.युरोपातील काही देशातही या लसी पुरवल्या जातात.या जाणून घेऊया या अभिमानास्पद बाबीची उगम कथा.

कोण आहेत सायरा पूनावाला आणि कस काम करत त्यां सिरम इन्स्टिट्यूट

सायरस पूनावाला हे नाव तस अनोळखी नसून त्यांची शैक्षणिक संस्था सर्वपरिचित आहे. उद्योग मानसिकता असलेल्या पारशी समाजातील सायरस पूनावाला अत्यंत दिर्घोद्योगी, दूरदृष्टी असणारे आहेत.कलेची उत्तम जाण असलेल्या सायरा यांच्याकडे जगातल्या सर्वोत्तम चित्रांचा खासगी खजिना आहे. आलिशान स्पोर्ट्सकार आणि प्रायव्हेट जेट त्यांच्या दिमतीला आहे. सायरस पूनावाला यांचा मूळचा उद्योग स्टफ फार्म होय.जातिवंत घोडे जतन करणे, त्यांची पैदास वाढवणे हा त्यांचा मूळ धंदा आहे.त्याला अनुसरून घोड्यांच्या शर्यती हा अत्यंत महागडा आणि शौकीन लोकांचा आवडता खेळ हा त्यांचा व्यवसाय.

ब्रिटीश काळात हा खेळ अत्यंत लोकप्रिय होता परंतु ब्रिटिश गेले आणि भारतीयांना घोड्यांच्या शर्यतीच फारसं आकर्षण उरलं नाही. स्टफ फार्मा त्यांचा धंदा अडचणीत आला.परिणामी लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत पसरलेल्या जमिनी टिकवायच्या, शेकडो घोडे जगवायचे प्रतिकूल ठरू लागल.शेवटी कंटाळूनघोड्यांचा धंदा बंद करण्याचा विचार सायरस पूनावालानी साठच्या दशकात सुरू केला. नवीन काहीतरी करण्याची आवड असलेल्या सायरा पूनावाला यांनी स्पोर्ट्सकार बनवून विकण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला.युरोपमध्ये लोकप्रिय ठरू लागलेला स्पोर्ट्स कारचा प्रकार भारतात तितकासा रुचला नाही.भारतीय श्रीमंतांची मानसिकता लोकल फ्लॅमबॉयन्स विकसित करण्याइतपत विकसित होत नव्हती.

पुण्याला घोडे द्यायचे डोनेट

पूनावालाया सर्व आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच शर्यतीतून बाद झालेले घोडे हाफकिन इन्स्टिट्यूटला डोनेट करायचे.या संस्थेत या घोड्यांच्या रक्ताचा वापर लस तयार करण्यासाठी केला जात असे.याच कारण म्हणजे घोड्याच्या रक्त बेस म्हणून वापरलं जातं.या सर्व प्रक्रियेची उत्सुकता वाटून पूनावालांनी हाफकिनच्या एका पशु डॉक्टरकडून यातील मेख जाणून घेतली.या माहितीत त्यांना लक्षात आल की,आधुनिक वैद्यकशास्त्रात त्यांचे घोडेच त्यांना उद्योग आणिपैसा मिळवून देऊ शकतात.घोड्याच्या रक्तापासून अँटिटॉक्सिन तयार करण्याच्या जुन्या उद्योगाला त्यांनी आधुनिक विज्ञानाची जोड देत१९६६ साली पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटची उभारणी केली.

स्टडफार्ममधील घोडे त्यांनी वापरात आणले अत्यंत जातिवंत तसेच योग्य निगा राखलेले हे घोडे त्यांच्या व्यवसायात उपयुक्त ठरले.सिरम इन्स्टिट्यूटने मोठ्या प्रमाणावर लसी तयार करण्यास सुरुवात केली. १९७४ साली सिरम इन्स्टिट्यूटची घटसर्पावरची एक लस तयार केली ती अत्यंत प्रभावी व उपयुक्त ठरली.त्यांची ही घोडदौड वेगात सुरू झाली आणि त्यांनी डांग्या खोकल्यावर औषध काढल व१९८१ साली त्यांची सर्पदंशावरची प्रतिबंधक लसही प्रभावी व लोकप्रिय झाली.सद्यस्थितीत १०० हून अधिक देशांत सिरम इन्स्टिट्यूट लसींचा पुरवठा करते.जगातल्या प्रत्येक दोन बालकापैकी एकाला जी लस टोचली जाते ती सिरम इन्स्टिट्यूटची असते असे अभिमानाने आणि नम्रतेने सायरस पूनावाल सांगतात.

पूनावालांची संपत्ती

साठच्या दशकात घोड्यांची पैदास करणारे सायरस आजमितीला वर्षाला ५० कोटी लशींचे डोस विकत भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांचा नंबर १००वा आहे.पूनावालांची संपत्ती १३ अब्ज डॉलर्स इतकी आहे. सिरम इन्स्टिट्यूटने युरोपातल्या आघाडीच्या दोन कंपन्या विकत घेतल्या असून एका वर्षात १० हजार कोटींचा महसूल तयार करणारी ही कंपनी वर्षाला दीड अब्ज डोस तयार करू शकते. म्हणूनच जग संशोधनात कितीही पुढे असलं तरी शेवटी जगाला वाचवणारी लस भारतातच तयार होणार हे आपण खात्रीने सांगू शकतो. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा लसींचे उत्पादन केवळ सिरममुळेच शक्य होते.कोरोनावरील ऑक्सफर्डची जी लस तयार होते आहे तिच्या उत्पादनाचा करार पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटसोबत आहे.स्टड फार्म चालवणारा हा पारशी अवलिया तुम्हाल बेफाम धावणाऱ्या घोड्यांपासून जीव वाच वतील अशा लसी तयार करण्यात अग्रणी दिसेल.तुमचा देश अभिमान हे सर्व जाणून नक्कीच सुखावले.