Home » राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतीनचं प्रेमप्रकरण तितकंच वादग्रस्त आहे
Articles झाल कि व्हायरल!

राजकारणात आक्रमक, वादग्रस्त असलेल्या पुतीनचं प्रेमप्रकरण तितकंच वादग्रस्त आहे


जगात सध्या एकाच माणसाची चर्चा आहे, तो माणूस हिटलर म्हणून समोर येत आहे. हा माणूस आहे रशियाचे राष्ट्रध्यक्ष पुतीन याचं नाव जगभरात चर्चेत आहे. पुतीन यांनी यूक्रेन विरुद्ध युद्धाचं रणशिंग त्यांनी फुंकले आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा आता एक विद्रोही आक्रमक आणि नकारात्मक व्यक्ती, नेतृत्व म्हणून देखील कुप्रसिद्ध होत आहे. आज आपण पुतीन यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

पुतीन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी सोविएत युनियन मधील लेनिनगार्ड येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण त्यानं बासकोव्ह येथे पूर्ण केले. ज्यूडो कराटे त्यांना खूप आवड होती. पुतीन यांनी 1975 मध्ये वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. मग कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएत युनियन या राजकीय पक्षात त्यांनी प्रवेश केला.

त्यांच्या करियरची सुरुवात केजीबी या गुफ्तचर संस्थेच्या इंटेलिजन्स ऑफिसर या पदांपासून केली. तेथे त्यांनी तब्बल 16 वर्ष काम केलं. 1996 मध्ये ते मॉस्कोमध्ये स्थळांतरीत झाले.बेरीस येल्लिसन्स यांनी स्थापित केलेल्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसेस सोबत डायरेक्टर पदावर काम करण्यासाठी आणि त्याच सोबत सेक्रेटरी ऑफ सिक्युरिटी कौन्सिल हे पद सुद्धा त्यांनी भूषवलं.

1999 मध्ये बेरीस येल्लसिन यांनी आपल्या राष्ट्रध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुतीन यांना पहिल्यांदा अॅक्टिंग प्रेसिडेंट म्हणून पहिल्यांदा निवड झाली. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे पुतीन यांना रशियाच्या लोकांचे समर्थन मिळाले.

चार महिन्यांत झालेल्या निवडणुकीत ते प्रेसिडेन्ट म्हणून निवडणून आले, 2004 मध्ये झालेल्या राष्ट्रध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांनी आपलं प्रेसिडेंट पद राखलं. अशा प्रकरे रशियाच्या राजकारणात स्वताची पकड मजबूत केली.

1983 साली केबिजी गुप्तचर संस्थेत काम करताना त्यांची ओळख लिउदमीला शक्रेबनेवायांच्या सोबत झाली आणि लवकरच ते विवाहबंधनात अडकले. त्यांना मारिया आणि येकातेरीना ही त्यांच्या दोन मुलीची नावे आहेत. या दोघांचा संसार 30 वर्ष चालला. 2013 मध्ये ते विभक्त झाले. रशियाची प्रथम स्त्री असून देखील पुतीन यांची पत्नी कधीच प्रसारमाध्यमांसमोर आल्या नाहीत.

पण त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे असे म्हटले जाते. पुतीन यांची राजकीय कारकीर्द उत्तम बहरत होती. त्यांचा संसार देखील उत्तम सुरू होता पण अचानक प्रसिद्ध जिमनास्टिक खेळाडू अलिना काबाएवा हिच्या सोबत जोडलं गेलं. पुतीन यांनी हे नातं कधी कबूल केलं नाही पण कधी विरोध देखील केला नाही.

2008 मध्ये एका रशियन वर्तमानपत्राने हे देखील छापलं की पुतीन आणि अलिना यांचा साखरपुडा झाला आहे. रशियातील काही वृत्तपत्र संस्थांनी असा दावा केला की पुतीन आणि अलिना यांना दोन जुळ्या मुली देखील आहेत. ज्यांना कधीच प्रसिद्धी माध्यमासमोर येऊ दिलं गेलं नाही.

आलिना हिने तीच्या कारकीर्दी मध्ये रशियासाठी अथेन्स ऑलम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती. सिनडी ऑलम्पिकमध्ये तिने कांस्यपदक जिंकलं होतं.

अलिना काबाएवाचा जन्म 12 मे 1983 रोजी मॉस्कोमध्ये झाला होता. आपल्या जिमनास्टिक करियरमध्ये एकूण 41 पदकांची कमाई केली. पुतीन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कौतुक देखील केलं होतं. दोघांनामध्ये जवळीक वाढली आणि त्यामुळे अलिनाला स्टेट डयूमा डेप्युटी या पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला.

जिमनास्टिकमधून तिने निवृती घेतल्यानंतर अलिना काबाएवा यांना मिडियामध्ये काम करण्याची संधी मिळाली, पुतीन यांनी यामध्ये खूप मदत केली. नॅशनल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. 2005 मध्ये अलिनाला पब्लिक चेअर ऑफ रशियाचा सदस्य होण्याचा मान मिळाला. 2008 मध्ये ती नॅशनल ग्रुपच्या चेअरवूमन पदाची जबाबदारी सोपविण्यात आली

सप्टेंबर 2014 मध्ये अलिना यांना नॅशनल मीडिया ग्रुपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं. राजकीय पदांवर काम करत असताना त्यांना मिळणारा पगार आणि त्यांच्या कामाचा अजिबात नसलेला अनुभव हा चर्चेचा विषय होता.

2019 पर्यत अलिना या सार्वजनिक कार्यक्रमात दिसायच्या पण नंतर मात्र त्या प्रसारमाध्यमापासून नेहमीच दूर राहिल्या. पुतीन ज्या प्रमाणे सध्या यूक्रेनविषयी एकही शब्द चर्चेत घेत नाहीत तसेच अलिना यांच्याबद्दल देखील ते एकही शब्द बोलत नाहीत.

2016 मध्ये सार्वजनिक ठिकाणी अंगठी घालून दिसलेल्या अलिना काबाएवा आता कुठे आहेत? हे पुतीन यांच्या शिवाय कोणालाच माहीत नाहीये, पण या दोघांच्या नात्यामुळे अलिना इतक्या मोठ्या पदावर इतक्या कमी वयात पोहोचु शकल्या. हे संपूर्ण रशियाला माहीत आहेत. पुतीन लकवरच युद्ध थांबवून पुन्हा एकदा रोमॅंटिक माणूस म्हणून जगाला दिसतील.