रतन टाटा त्यांचं वय जरी 84 असलं तरी भारतातील युवकांना सर्वात जास्त आवडणारे उद्योजक कोण असतील तर ते आहेत रतन टाटा. अनेक युवकांनाचे प्रेरणा स्थान असणारे टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचा वाढदिवस साजरा करतानाचा एक विडियो अवघ्या काही दिवसापूर्वी व्हायरलं झाला होता.
या विडियोमध्ये रतन टाटा यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला होता. एक छोटासा कप केक त्यांनी कापला होता. त्यांना एका तरुण मुलाने हा केक भरविला. टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या सोबत उभा राहणार हा युवक कोण? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
तर हा तरुण म्हणजे शंतनू नायडू हा आहे. शंतनू हा 30 वर्षाचा आहे.तो रतन टाटा यांचा सचिव आहे. म्हणजेच पीए आहे. रतन टाटा यांनी स्वता फोन करून शंतनूला त्यांच्याकडे नोकरी करण्याची ऑफर दिली होती. तो मागील तीन वर्षांपासून टाटा ग्रुपमध्ये काम करत आहे. रतन टाटा त्याला युवा दोस्त म्हणतात.