Home » बाळासाहेबांच्या एका ओळीच्या पत्राचा मान ठेवत मनोहर जोशींनी राजीनामा दिला
Articles आपलं राजकारण

बाळासाहेबांच्या एका ओळीच्या पत्राचा मान ठेवत मनोहर जोशींनी राजीनामा दिला


मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे नेहमी चर्चेत असतात. पण काल पासून उद्धव चर्चेत आहेत ते त्यांच्या सासरवाडीच्या लोकांमुळे.रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यामुळे उद्धव ठाकरे देखील अडचणीत आले आहेत. सासरवाडीमुळे अडचणीत येणारे उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री नाहीत.

याआधी देखील सेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशीआणि कॉंग्रेसचे अशोक चव्हाण हे देखील त्यांच्या सासरवाडीच्या लोकांमुळे अडचणीत आले होते. त्यांना यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. मनोहर जोशी महाराष्ट्राचे एक उच्चशिक्षित मुख्यमंत्री होते, पण शाळेसाठी राखीव असलेला भूखंड त्यांनी त्यांच्या जावयाला दिला.

मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास हे एक बिल्डर आहेत. त्यांना पुण्यातील कोथरूड परिसरात एक मोठी बिल्डिंग बांधायची होती पण तो भूखंड शाळेसाठी राखीव होता.

या प्रोजेक्टची फाइल मुख्यमंत्री कार्यालयात आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यांनी आरक्षित भूखंड त्यांच्या जावयाला दिला आणि येथेच ते अडकले. हे प्रकरण कोर्टात गेलं, कोर्टाने मनोहर जोशी यांच्यावर ताशेरे ओढले. बाळासाहेबांना देखील ही गोष्ट पटली नाही. त्यांनी मनोहर जोशीना फक्त एक ओळीचे पत्र लिहिले. राजीनामा द्या.

जोशीनी दुसऱ्या मिनिटाला राजीनामा दिला. या घटनेनंतर देखील बाळासाहेब कित्येक दिवस जोशी यांच्याशी बोलत नव्हते. कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना देखील त्यांच्या सासुमुळे राजीनामा द्यावा लागला होता. आदर्श घोटाळा समोर आला आणि चव्हाण यांचे मुख्यमंत्री पद गेले. आता उद्धव ठाकरे देखील त्यांचे मुख्यमंत्री पद गमावणार का? हा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.