मैत्री म्हणजे प्रेमाचा झरा, मैत्री म्हणजे कल्ला, मैत्री म्हणजे दोस्ती, मैत्री म्हणजे यारी आणि मैत्री म्हणजे दुनियादारी. माणूस कितीही मोठा होऊ देत एकवेळेस तो नातेवाईकांना विसरेल पण आपल्या जिवाभावाच्या दोस्ताला मात्र विसरणार नाही. मित्र भेटतात अपमान करतात पण त्यांच्या अपमानात मात्र एक वेगळंच प्रेम असतं. त्यांचा सहवास हवा-हवासा वाटतो.
रितेशने काल असाच एक फोटो शेअर केला आणि पुन्हा मैत्री म्हणजे सर्वकाही हे सिद्ध झालं. रितेश देशमुख म्हणजे मराठी आणि हिंदी चित्रपट विश्वातील एक नावाजलेला चेहरा, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा, प्रसिद्ध अभिनेत्री जेनीलिया देशमुखचा नवरा पण या सर्वांपेक्षा तो एक सच्चा माणूस म्हणून जवळचा वाटतो.
रितेश सोशल मिडियावर प्रचंड अॅकटीव्ह असतो. त्यांचे अनेक विडियो आणि पोस्ट व्हायरलं होत असतात. काल रितेशने त्यांच्या लहानपणीच्या मित्रांचा फोटो शेअर केलाआणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रकाश झरेकर रितेशचा लातूर तालुक्यातील बाभळगावचा मित्र आहे. रितेशने पोस्ट लिहिताना म्हटले आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रकाश झरेकर. हा माझा बाभळगाव, लातूर तालुक्यातील खास मित्र. अनेकवर्ष उलटली आमची मैत्री मात्र कायम तिथेच तग धरून राहिलीये. असे रितेशने लिहिले आहे.
रितेशच्या या पोस्टवरुन एक गोष्ट लक्षात येते की सर्व काही बदलून जाते पण मैत्री मात्र कायम तिथेच आणि तशीच राहते. हे आम्ही नाही तर रितेशची पोस्टच सांगते. रितेश एक कलाकार म्हणून उत्तम आहेच पण एक मित्र आणि माणूस म्हणून तो आणखी उत्तम आहे.
तुम्ही आकाशला जरी गवसणी घातली तरी तुमचे पाय- मुळे मात्र जमिनीवर असायला हवेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रितेश देशमुख.