Home » वडिलांच्या त्या एका वाक्यामुळे सावित्रीबाईनी घेतली उच्च शिक्षण घेण्याची शपथ
Articles खास किस्से खास तुमच्यासाठी!

वडिलांच्या त्या एका वाक्यामुळे सावित्रीबाईनी घेतली उच्च शिक्षण घेण्याची शपथ


भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचले. समाजाची सेवा देखील केली. पहिली महिला शिक्षिका देखील सावित्रीबाई बनल्या. पण त्यांचा हा प्रवास इतका सोप्पा नव्हता.सावित्री बाईंना त्यासाठी अंगावर शेण-माती, दगड धोंडे देखील झेलावे लागले.

जोतिबा सावित्री बाईंना म्हणाले होते, जर तुला अनेक महिलांना शिक्षणाची कवाडे खुली करायची असतील तर तुला स्वताला आधी उच्च शिक्षित व्हावे लागेल. सावित्रीबाई स्वता शिकल्या आणि त्यांनी कित्येकीना शिक्षणाची कवाडे खोलून दिली.सावित्री बाई यांच्या जीवनातील आज आपण अशी एक घटना पाहणार आहोत, ज्यामुळे सावित्रीबाई यांनी उच्च शिक्षण घेण्याची शपथ घेतली.

एके दिवशी सावित्रीबाई खोलीत एका इंग्लिश पुस्तकांची पाने चाळत बसल्या होत्या, त्यांना त्यातील समजत काहीच नव्हते पण त्या पानं उलटत बसल्या होत्या. हे त्यांच्या वाडिलांनी पाहिले आणि त्यांच्या हातातले पुस्तक हिरावून घेतले, केवळ उच्चवर्णीय पुरुषांना शिक्षणाचा अधिकार आहे. महिलांना शिक्षण घेणे हे पाप आहे असं ते म्हणाले.

हाच तो क्षण ज्यावेळी सावित्रीबाईनी शपथ घेतली की एक ना एक दिवस त्या नक्की शिक्षण घेतील पुढे त्या शिकल्या आणि त्यांनी कित्येक मुलीना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. सावित्री बाई फुले यांचे महिला शिक्षणासाठी केलेले कार्य हे सोनेरी अक्षरात इतिहासात लिहिले गेले आहे. आज महिला अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत, त्यांचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते.