द काश्मीर फाइल्स हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमाने केवळ 11 दिवसांत 200 करोंड रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. काश्मीर फाइल्स जरी चर्चेत असला तरी सामान्य प्रेक्षक मात्र खान मंडळीवर चांगलेच नाराज आहेत.
कारण कोणत्याच खान मंडळीनी चित्रपटांचे कौतुक केलेले नाही. आमीर खानने फक्त चित्रपट पहावा असे म्हटले आहे. शाहरुख मात्र सध्या चर्चेत आहे. मागील काही दिवसांचा विचार करता शाहरुखचे दिवस मात्र इतके चांगले नव्हते आता तो चर्चेत आहे. शाहरुखने काही वर्षांपूर्वी एक चांगली गोष्ट केली होती आणि आता मात्र त्यांची चर्चा सुरू आहे.
शाहरुखने एका काश्मिरी पंडित कुटुंबाला मदत केली होती. त्या संदर्भात दिग्दर्शक अशोक पंडित याचं एक बरचं जुनं ट्विट सध्या व्हायरलं होत आहे. या मागे नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत.

ही घटना 2015 साली घडली होती. डीएनएच्या एका आर्टिकलमध्ये यांचा उल्लेख केला आहे. 1990 मध्ये काश्मिरी हिंदू कुटुंब काश्मीरमधून पलायन करून दिल्लीमध्ये आले होते. या कुटुंबाचे नाव आहे दीपक रैना. 2015 या कुटुंबाला एक गंभीर अपघात झाला.
या अपघातात दीपक यांच्या आईचा जागीच मृत्यु झाला. दीपक यांची पत्नी आणि 2 वर्षा ची मुलगी हे देखील गंभीर जखमी झाले. दीपक यांची पत्नी कोमात गेली तर त्यांची मुलगी देखील कंबरेखाली आधु झाली. त्यांच्या उपचारासाठी लाखों रुपयांचा खर्च होता. कुटुंबाला परवडणारा नव्हता. दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ही घटना समजली त्यांनी तातडीने

शाहरुखला ही घटना सांगितली. शाहरुखने क्षणाचा विलंब न लावता 3 लाखांचा चेक त्या कुटुंबाच्या उपचारासाठी पाठविला. अशोक पंडित यांनी त्यावेळीच शाहरुखचे आभार मानले होते. ते ट्विट सध्या व्हायलरलं होत आहे.