सध्या महाराष्ट्रात एक वेगळीच चर्चा सुरू आहे. ही चर्चा अशी आहे की, एमआयएम पक्षांकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर आली आहे.आता हिंदुत्ववादी शिवसेना आणि कट्टर मुस्लिम विचारांचा असणारा पक्ष एमआयएम एकत्र येतील का असा प्रश्न समस्त महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे.
भाजपाने तर लगेच सेनेची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर चक्क शिवसेनेला टोमणा मारला आहे. फडणवीस म्हणतात की हिंदूसम्राट पेक्षा आता शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेले आहे की काय? म्हणून एमआयएम सोबत आघाडी करताय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र स्पष्टीकरण दिले आहे. एमआयएम ही बी टीम आहे. भाजपाची बी टीम असलेल्या एम आय एम सोबत आम्ही जाणार नाही.
अफजल गुरूला फाशी देऊ नका म्हणाणाऱ्या मेहबूब मुफ्तीसोबत सत्तेसाठी मागणी करणाऱ्या एमआयएम सोबत आम्ही जाणार नाही. सत्ता मिळत असली तरी ही युती शक्य नाही. असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना जरी कट्टर हिंदूत्ववादी असली तरी सेनेचा इतिहास आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की सेनेने याआधी देखील अनेक पक्षा सोबत छुपी आणि खुली युती केलेली आहे.
सेनेने आता किती ही नकार दिला तरी सेनेने मागे असाच एक प्रयोग केला होता. बाळासाहेब असताना मुंबईत सत्ता आणण्यासाठी मुस्लिम लीग सोबत युती केली होती.सेनेने याआधी मुस्लिम लीग, पॅथर, कॉँग्रेस यांच्या सोबत युती केलेल्या आहेत.
याला अपवाद आहे तो फक्त आणि फक्त कम्युनिटी पक्षाचा, आता जरी सेना म्हणत असेल की आम्ही एमआयएम सोबत जाणार नाहीत पण 1979 रोजी सेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुस्लिम लीग सोबत युती केली होती. साल 1973 – 74 साली याचं निमित्त ठरली पालिकेची निवडणूक. सेनेने मुंबईत महापौर पदांची निवडणूक जिंकण्यासाठी मुस्लिम लीगच्या नगर सेवकांना सेनेत घेतलं होतं.
1972 साली शिवसेना नेते असलेले सुधीर जोशी मुस्लिम लीगच्या पाठिंब्यावर मुंबईचे महापौर झाले होते. पण हा पाठींबा घेताना एक अट टाकली होती ती अट म्हणजे महापौरांनी मुस्लिम लीगच्या नगरसेवकांना एक सूट द्यावी जेव्हा सभागृहात वंदे मातरम गायले जाईल तेव्हा तटस्थ राहिले जावे.बाळासाहेब ठाकरे यांनी मुस्लिम नेते जी. एम.बनातवाला यांच्या सोबत मस्तान तलावावर एक जाहीर सभा देखील घेतली होती.