१४ नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांचा जन्मं झाला. सिंधुताई सपकाळ यांना जरी आपण समाजसेविका म्हणून ओळखत असलो तरी लोक प्रेमाने माई म्हणून हाक मारतात. मुळच्या त्या विदर्भातच्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव हे त्यांचं जन्मगाव. माईचे वडील अभिमान साठे हे गुरे सांभाळण्याचे काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेलं आणि शहराचा जराही स्पर्श नसलेलं गाव. त्या गावात कुणालाही शिक्षणाचा गंध नव्हता अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात राहायला आले.
अभिमान साठे यांची सर्वात मोठी मुलगी म्हणजे सिंधुताई सपकाळ, तिला लहानपणी चिंधी या नावाने पुकारल जायचं. आपल्या मुलींन शिकावं अस अभिमान साठे यांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र यस शक्त विरोध होता. म्हणून माई ला लहानपणी गुर राखायला पाठवल जायचं, इकडे माई चोरून जाऊन शाळेत बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठी शिकता आली अल्प वयात त्याचं लग्नहि झाल चिंधा साठे च चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाल. जेव्हा लग्न झाल तेंव्हा माईच वय होत केवळ ११ वर्ष आणि नवऱ्याचे वय ३० वर्ष. दोखाच्या वयात बरीच तफावत. घरात प्रचंड सासुरवास, आणि बरीच मेहनत, या सगळ्या गोष्टीचा गाडा हाकत असताना १८ व्या वयापर्यंत माईची ३ बाळंतपण झाली.
त्या चौथ्यावेळी गर्भवती होत्या त्या वेळी त्यांनी पहिला संघर्ष केला. तेंव्हा गुरे वळण हा त्यांचा व्यवसाय होता. गुरे हि शेकड्यांनी असायची आणि गुऱ्याची शेण काढता काढता अक्षरशा कंबर मोडायची. स्त्रिया शेण काढून काढून अर्धमेल्या होत असत पण त्याबदल्यात त्यांना कुठलीही मजुरी मिळायची नाही. म्हणून माईनि तेंव्हाच जामीनदाराविरुद्ध बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण हा लढायीची किमत त्यांना चुकवावी लागली.
बाईच हे धैर्य गावच्या जमीनदाराला पाहवल नाही, कारण तिथून मिळणारी मिळकत तिथे बंद झाली. आणि गावातील लोकांना माई चे नवीन नेतृत्व मिळाले. या गोष्टीचा काटाकाढण्यासाठी माईच्या पोटातील मुल आपल असल्याचा खोटा प्रचार त्या जमीनदाराने सुरु केला या गोष्टीमुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. यावरून श्रीहरी सपकाळ याने माईला मारहाण करून एका गोठ्यात आणून टाकल आणि तिथेच त्याचं बाळंतपण झाल.
पतीने घरातून हाकलून लावल त्यानंतर गावकरी लोकांनीही तिला गावातून बाहेर काढल. माराने अर्धमेल्या झालेली माई नंतर त्यांच्या माहेरी आल्या,पण सख्या आईने सुद्धा तिला राहायला जागा दिली नाही. पोट भरण्यासाठी वेळ आली ती म्हणजे भीख मागण्याची. परभणी, नांदेड, मनमाड स्टेशन वर त्या भीख मागत असत आणि तिथेच झोपत असत.
उघड्यावर झोपणे बरोबर नसल्याने माईने शेवटी स्मशान गाठलं त्यांतर त्या स्मशानात राहू लागल्या, पण माईच्या पोटाची सोय काही होत नव्हती. एखादा मृतुदेह आला, अंत्यसंस्कार झाले अंत्यविधी करून लॉक निघाले तर तेंव्हा कुठे एखादा पैसा हातावर पडेल म्हणून त्यांच्या मागे माई चालू लागल्या. अखेर एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना जरा पीठ दिल, पैसे दिले, माईनि मडक्यात पीठ कालवल चीतेवरच्या निखार्या वर भाजल आणि कडकड भाकरी केली आणि तसीच खाली.
माईच्या जीवनात ऐक प्रसंग घडला. पुण्यात माईला रस्त्यावर ऐक मुलगा रडताना दिसला, त्याला त्याच केवळ नाव सांगता येत होत दिवक गायकवाड. पोलीस स्टेशन तक्रार न घेता त्यांना पोलिसांनी हुसकावून लावलं.त्यानंतर माईनि त्याला सोबत ठेवत बाकीच्यना पण सहारा दिला. निरधार लोकांच जीवन किती भयंकर असते हे माईला माहित होते. हे या मुलांच्या वाटायला येऊ नये हीच त्यांची इच्छा होती.
निरधार लोकांच्या कल्याणासाठी माईनी त्यांच्या स्वताच्या मुलीला म्हणजेच ममताला दगडूशेठ हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे ह्यांच्याकडे साभाळन्यास दिले. ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज साभाळू शकत होत्या पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईनि काय केल असत. मुलांसमोर ममतासाठी माईची आईपण जागूनये म्हणून त्यांना हा नर्णय घ्यावा लागला.
आज महाराष्टातमाई चे चार अनाथ आश्रम आहेत. काही दिवसापूर्वी चिखलदरा इथे वस्तीग्रह सुरु केले. आज बऱ्याच मुली इथे राहून शिक्षण घेतात. त्याच्या मुलांना वयाची काही सीमा नाही २ वर्षापासून तर वृद्धा पर्यन्त सर्व तिचे मुले आहेत्त.त्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचे आडनाव सपकाळ अश्या ठेवत असत. त्यातील बरीचशी मुले शिकून स्वताच्या पायावर उभी सुद्धा झाली आहेत. माझी मुले डाक्टर, इंजिनियर, आणि वकील आहेत असा सांगताना मात्र माईचा चेहरा फुलून यायचा. ममता च शिक्षण MSW झालय आता ती माईच काम बघत असते. माईनि अनेक अनाथ मुलांना शिक्षण दिल जगण्याची नवीन संधी दिली, प्रेरणा दिली. यावरून ऐक मोठी गोष्ट म्हणजे अ जगाला मानवतेचा संदेश देऊन माई निघून गेली.